Police Commissioner: पोलीस आयुक्त्याचं व्हॉट्सॲप हॅक; स्टेटसवर 50 मिनिटे चालले अश्लील व्हिडिओ!

Thane Police Commissioner WhatsApp Hacked: ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर १९ अश्लील व्हिडीओ क्लिप्स पोस्ट झाल्याने खळबळ उडाली. जवळपास ५० मिनिटे सुरू असलेल्या या प्रकारामुळे अकाउंट हॅक झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.
Thane Police Commissioner WhatsApp Hacking Suspected | 19 Obscene Videos Posted
Thane Police Commissioner WhatsApp Hacking Suspected | 19 Obscene Videos Posted
Published On: 
Summary
  • ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांचे व्हॉट्सॲप अकाउंट हॅक झाल्याचा संशय

  • पोलीस आयुक्तांच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर १९ अश्लील व्हिडीओ पोस्ट

  • ठाणे पोलीस आयुक्तांच्या स्टेटसवर ५० मिनिटे अश्लील क्लिप्स

साक्षी यादव, साम प्रतिनिधी

ठाणे पोलीस दलातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांचे व्हॉट्सॲप अकाउंट हॅक झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. त्यांच्या अधिकृत व्हॉट्सॲप स्टेटसवर तब्बल १९ अश्लील व्हिडिओ क्लिप्स पोस्ट करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Thane Police Commissioner WhatsApp Hacking Suspected | 19 Obscene Videos Posted
Crime News: महिला पोलीस उपनिरीक्षकाचा बाथरूममध्ये आढळला मृतदेह; वडिलांच्या कॉलमुळे धक्कादायक प्रकार उघड

जवळपास ५० मिनिटे या क्लिप्स चालू होत्या. मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळी ४ वाजून ४६ मिनिटांनी पहिली व्हिडिओ क्लिप स्टेटसवर पोस्ट करण्यात आली होती. विशेष म्हणजे, स्टेटसवर ठेवण्यात आलेले व्हिडीओ डिलीट करता येत नव्हत्या. एका तासानंतर या पॉर्न क्लिप डिलीट करण्यात आल्या.

Thane Police Commissioner WhatsApp Hacking Suspected | 19 Obscene Videos Posted
Eknath Shinde: उद्धव यांची शहांवर टीका; शिंदेंनी दिलं उत्तर, म्हणाले, ठाकरे थापाडे!

दरम्यान या प्रकारामुळे ठाणे पोलीस आयुक्तांच्या व्हॉट्सॲप अकाउंटचा ताबा अज्ञात व्यक्तीने मिळवला आहे का, असा संशय व्यक्त केला जातोय. या प्रकारामुळे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या व्हॉट्सॲप सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असून, सायबर सेलच्या माध्यमातून तपास सुरू करण्यात आला आहे.

नेमका मोबाईल हॅक झाला आहे का, व्हॉट्सॲप अकाउंटचा गैरवापर झाला आहे का आणि यामागे कोणाचा हात आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान, सर्वसामान्य नागरिकांच्या सायबर सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या पोलीस आयुक्तांच्याच मोबाईलशी संबंधित असा प्रकार समोर आल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.