Eknath Shinde: उद्धव यांची शहांवर टीका; शिंदेंनी दिलं उत्तर, म्हणाले, ठाकरे थापाडे!

Uddhav Thackeray vs Eknath Shinde: अमित शाह यांच्यावरील उद्धव ठाकरेंच्या टीकेला एकनाथ शिंदेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. उद्धव ठाकरेंनी जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप करत शिंदेंनी त्यांच्यावर निशाणा साधला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केलेल्या टीकेला एकनाथ शिंदेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. उद्धव ठाकरेंना अमित शाह आणि पंतप्रधान मोदींवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाहीये. ते थापाडे आहेत, असा टोला एकनाथ शिंदेंनी लगावला. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेशी खोटं बोलून विश्वासघात केला आणि भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला, असा आरोपही शिंदेंनी माध्यमांशी बोलताना केला.

गृहमंत्री अमित शाह यांनी पुण्यातील कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी शाहांना उत्तर देताना त्यांचा उल्लेख चकाट्या पिटणारा गृहमंत्री, असा उल्लेख केला होता. ठाकरेंच्या या टीकेला एकनाथ शिंदेंनी उत्तर दिलं. 2019 मध्ये शिवसेना-भाजप युती असताना उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेशी खोटं बोलून विश्वासघात केला आणि भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला, असा आरोप भाजप नेत्याने केला. त्यामुळे अमित शाह यांना थापाडे म्हणण्याचा उद्धव ठाकरेंना नैतिक अधिकार नाहीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.