Diwali Bonus: महापालिका कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! बंपर दिवाळी बोनस मिळणार, खात्यात किती रुपये जमा होणार?

Thane Municipal Corporation: ठाणे महानगर पालिकेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा आणखी गोड होणार आहे. पालिका कर्मचाऱ्यांसाठी बोनस जाहीर करण्यात आला आहे. या कर्मचाऱ्यांना २४,५०० रुपये बोनस मिळणार आहे.
Diwali Bonus: महापालिका कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! बंपर दिवाळी बोनस मिळणार, खात्यात किती रुपये जमा होणार?
Deputy CM Eknath Shinde Saam Tv
Published On

Summary -

  • ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर

  • पालिका कर्मचाऱ्यांना २४,५०० रुपये दिवाळी बोनस मिळणार

  • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सानुग्रह अनुदानाचा निर्णय घेतला

  • ९२२१ कर्मचाऱ्यांच्या खात्यात बोनस तात्काळ जमा होणार

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना २४,५०० रुपयांचे दिवाळी बोनस म्हणजेच सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे ठाणे महानगर पालिकेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी आणखी गोड होणार आहे. दिवाळी बोनस जाहीर होताच पालिका कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

दिवाळी सणानिमित्ताने ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना २४,५०० रुपये इतके सानुग्रह अनुदान देण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांना दिले आहेत. या निर्णयामुळे महापालिकेच्या ९२२१ कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात जाणार आहे. या निर्णयामुळे पालिका कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.

Diwali Bonus: महापालिका कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! बंपर दिवाळी बोनस मिळणार, खात्यात किती रुपये जमा होणार?
Diwali Bonus: राज्यातील 'या' सरकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांची धन धन दिवाळी; मिळाला २० वर्षातील सर्वाधिक बोनस

गेल्यावर्षी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दिवाळीच्या निमित्ताने २४,००० रूपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. यावर्षी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार सन २०२५ साठी महापालिका कर्मचाऱ्यांना २४,५०० रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे. हे सानुग्रह अनुदान कर्मचाऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सानुग्रह अनुदानाचा निर्णय घेतला.

Diwali Bonus: महापालिका कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! बंपर दिवाळी बोनस मिळणार, खात्यात किती रुपये जमा होणार?
Diwali Bonus: दिवाळीला कमीत कमी किती बोनस मिळाला पाहिजे? काय आहे सरकारी नियम

महापालिकेचे कर्मचारी वर्षभर सर्व यंत्रणा सुरळीत सुरू रहावी यासाठी कार्यरत असतात आणि प्रचंड मेहनत घेतात. त्यांच्या सणाच्या आनंदात भर म्हणून हा सानुग्रह अनुदानाचा निर्णय घेण्यात आला आहे. सानुग्रह अनुदान जाहीर झाल्यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये दिवाळीपूर्वीच आनंदाचे वातावरण आहे. ठाणे महापालिकेचे ६०५९ कर्मचारी, शिक्षण विभागाचे ७७४ कर्मचारी, परिवहन विभागाचे १४०० कायम कर्मचारी, महापालिकेचे थेट कंत्राटी कर्मचारी आणि इतर ९८८ कर्मचारी यांना सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे ठाणे महापालिकेवर सानुग्रह अनुदानापोटी सुमारे २३ कोटी इतके अतिरिक्त दायित्व येणार आहे.

Diwali Bonus: महापालिका कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! बंपर दिवाळी बोनस मिळणार, खात्यात किती रुपये जमा होणार?
Bonus Called In Marathi: दिवाळीला मिळणाऱ्या बोनसला मराठीत काय म्हणतात? 99 टक्के लोकांना माहितच नाही?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com