Diwali Bonus: राज्यातील 'या' सरकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांची धन धन दिवाळी; मिळाला २० वर्षातील सर्वाधिक बोनस

Government Bank Bonus : महाराष्ट्रातील एका सहकारी बँकेने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी २० वर्षांतील सर्वाधिक दिवाळी बोनस जाहीर केला आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही १०,००० रुपयांचा विशेष बोनस मिळणार आहे.
Government Bank Bonus
State government bank employees celebrate after receiving the highest Diwali bonus in 20 yearssaam tv
Published On
Summary
  • राज्यातील सरकारी बँकेने आपल्या कर्मचाऱ्यांना २० वर्षांतील सर्वाधिक बोनस दिला.

  • दिवाळी आणि वर्धापन दिनाच्या निमित्ताने हा निर्णय घेण्यात आला.

  • कंत्राटी कामगारांनाही १० हजार रुपयांचा विशेष बोनस जाहीर केलाय

दिवाळी सणाला काही दिवस बाकी आहेत. दिवाळी सणाचे वेध लागताच कर्मचारी बोनसच्या घोषणेची वाट पाहत असतात. केंद्र सरकारने दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात मोठी वाढ केलीय. आता राज्यातील सरकारी बँकेने कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड केली आहे. वर्धापन दिनानिमित्त बँकेने आपल्या कर्मचाऱ्यांना २० वर्षातील सर्वाधिक बोनस दिलाय. इतकेच नाही तर कंत्राटी कामगारांनाही दिवाळीसाठी तब्बल १० हजार रुपयांचे बोनस जाहीर केला आहे.

बँकेचा ११४ वा वर्धापन दिन ११ ऑक्टोबर रोजी उत्साही वातावरणात पार पडला. या दिवशी झालेल्या सेवक सभेमध्ये बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी सेवकांना १४ टक्के सानुग्रह अनुदानाची भेट दिली. कोणत्याही संस्थेच्या यशात तेथील कर्मचाऱ्यांचा वाटा खूप मोठा असतो. ही वस्तुस्थिती स्वीकारुन राज्य सहकारी बँकेच्या प्रशासनाने नेहमीच सानुग्रह अनुदानाच्या माध्यमातुन राज्य बँकेच्या सेवकांची दिवाळी दरवर्षी अधिकाधिक गोड करण्याचा प्रयत्न केला आहे.

Government Bank Bonus
PF Balance : EPFO बॅलन्स तपासायचा आहे? जाणून घ्या हे 3 सोपे मार्ग

यंदाचे वर्षी म्हणजेच सन 2024-25 मध्ये बँकेने ६५१ कोटींचा विक्रमी नफा कमवलाय. बँकेचे नक्तमुल्य रु.५४०० कोटींच्या वर गेल्याने राज्य शासनाच्या निधींची गुंतवणूक करण्यासाठी राज्य शासनाने बँकेस पात्र ठरविले आहे. बँकेचा स्वनिधी रु.८४००० कोटींच्या वर गेल्याने बँकेस स्थैर्य प्राप्त झाले आहे. यासह आशिया खंडातील सर्वात सक्षम राज्य बँक म्हणून बँकेने नावलौकीक मिळवला आहे.

Government Bank Bonus
कोणत्या पुलाखालून जायचंय? कुठे घ्यायचा टर्न, Mappls सुचवेल योग्य रस्ता; Google Maps ला देणार टक्कर

सन २०१७-१८ मध्ये बँकेचा प्रति कर्मचारी व्यवसाय २६ कोटी होता. तो आज ७५ कोटींवर पोहचला आहे. यावरुन बँकेच्या वाढीमधील सेवकांचे योगदान अधोरेखीत होते. याचीच जाणीव ठेऊन प्रशासनाने सन २०१८१९ मध्ये जाहीर केलेल्या बोनसमध्ये दरवर्षी वाढ करत तो १० टक्के, १२ टक्के, १२.५० टक्के, १३.२५ टक्के, १३.५० टक्के, १३.५० टक्के अशा चढत्या क्रमाने यंदाचे वर्षी मागील दोन वर्षातील उच्चांकी असा १४ टक्के बोनस जाहीर केला आहे.

प्रशासनाने कंत्राटी पद्धतीने कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही १०,००० रुपयांची दिवाळी भेट दिली आहे. बोनसची रक्कम बँकेच्या वर्धापन दिनाच्या दिवशी सेवकांच्या खात्याला जमा झाल्याने सेवक वर्गांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यामुळे यंदाची दिवाळी अति गोड जाणार अशीच भावना सेवक व्यक्त करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com