कोणत्या पुलाखालून जायचंय? कुठे घ्यायचा टर्न, Mappls सुचवेल योग्य रस्ता; Google Maps ला देणार टक्कर

Mappls vs Google Maps: स्वदेशी अ‍ॅप्सची लोकप्रियता वाढू लागलीय. झोहोनंतर आता मॅपल्स नावाचे नेव्हिगेशन अ‍ॅप लोकप्रिय होत आहे. हे गुगल मॅप्सला पर्याय म्हणून योग्य असल्याचं म्हटलं जात आहे.
Mappls vs Google Maps
Union Minister Ashwini Vaishnaw using the Indian-made Mappls app, a new challenger to Google Maps.saamtv
Published On
Summary
  • मॅपल्स हे Made in India नेव्हिगेशन अ‍ॅप गुगल मॅप्सला टक्कर देईल.

  • केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या अ‍ॅपचा वापर करण्याचे आवाहन केलंय.

  • अ‍ॅपमध्ये हायपर-लोकल सर्च आणि व्हॉइस-गाइडेड नेव्हिगेशनचे फीचर्स आहे.

झोहोचे अरत्ताई चॅटिंग अ‍ॅप आणि उला ब्राउझर अलिकडच्या काळात खूप लोकप्रिय झालेत. आता आणखी एक मेड-इन-इंडिया अॅप चर्चेत आलंय. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांना भारतात विकसित केलेल्या मॅपल्स नेव्हिगेशन अॅपचा वापर करताना दिसले. त्यांनी भारतीय युझर्सला हे अ‍ॅप वापरण्याचे आवाहनदेखील केलंय. हे अ‍ॅप गुगल मॅप्सला टक्कर देणारं आहे. या अ‍ॅपमध्ये व्हॉइस-गाइडेड दिशानिर्देश आणि हायपर-लोकल सर्चसह अनेक फीचर्स असणार आहेत.

Mappls vs Google Maps
मायक्रोसॉफ्ट आणि गुगलला टक्कर देणार 'झोहो'; काय आहे स्वदेशी प्लेटफॉर्म Zoho?

३डी जंक्शन व्ह्यू

MapmyIndia ने Mappls मॅपल्स अ‍ॅप विकसित केलंय. युझर्सला स्थानिकीकृत, सुरक्षित आणि युझर्ससाठी अनुकूल मॅपिंग अनुभव देईल, असा दावा कंपनीकडून करण्यात येत आहे. या अ‍ॅपमध्ये 3D जंक्शन व्ह्यू नावाचे फीचर आहे. जे युझर्सला ओव्हरब्रिज आणि अंडरपासबद्दल स्पष्ट माहिती देत असते. यामुळे गाडी चालवताना युझर्सचा गोंधळ उडणार नाही.

Mappls vs Google Maps
Bullet Train: मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन कधीपासून सुरू होणार? रेल्वे मंत्र्यांनी थेट तारीखच सांगितली

आपण अनेकदा पाहिलंय की, गुगल मॅप्स वापरताना अनेकांचा गोंधळ उडत असतो. कारण त्यात तसे फीचर्स नाहीये. यासह मॅपल्स इनडोअर नेव्हिगेशन देखील देत असते. ज्यामुळे मोठ्या इमारती आणि कॉम्प्लेक्समध्ये नेव्हिगेट करणे सोपे होते. हे फीचर्स गुगल मॅप्ससह अनेक प्लॅटफॉर्मवर उपलब्ध नाहीये.

Mappls युझर्सचा डेटा भारतातच साठवला जातो. गुगल आणि अ‍ॅपल मॅप्सप्रमाणे या अ‍ॅपचा डेटा परदेशात साठवला जात नाही. दरम्यान हे अ‍ॅप वापरण्याचे आवाहन करताना माहिती आणि प्रसार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की, या अ‍ॅपचा वापर भारतीय रेल्वे सेवेतही करता येणार. MapmyIndia ने इंडिया पोस्टच्या सहकार्याने, आम्ही डिजिटल अ‍ॅड्रेस सिस्टम DIGIPIN लाँच केली आहे. ही प्रणाली देशातील प्रत्येक 3.8 चौरस ब्लॉकसाठी एक अद्वितीय डिजिटल कोड तयार करते. यामुळे नकाशावर कोणतेही स्थान शोधणे सोपे होत असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com