ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
दसरा आणि दिवाळी जवळ येत असताना, प्रत्येकजण बोनसची वाट पाहत असतो. दिवाळीच्या काळात खाजगी आणि सरकारी कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांना बोनस दिला जातो.
पण तुम्हाला माहित आहे का की, कर्मचाऱ्यांना कोणत्या कायद्याअंतर्गत बोनस दिला जातो? जाणून घ्या.
सणांच्या काळात लोकांचा खर्च लक्षणीयरीत्या वाढतो, अशावेळी कर्मचाऱ्यांवरील भार कमी करण्यासाठी बोनस दिला जातो. तसेच या कायद्याचे उद्दिष्ट कर्मचाऱ्यांना कंपनीच्या नफ्यातील वाटा देणे आहे.
माहितीनुसार, दिवाळी बोनसची परंपरा भारतात १९४० मध्ये ब्रिटिश राजवटीत सुरू झाली. पहिला दिवाळी बोनस १९४० मध्ये जाहीर करण्यात आला.
१९६५ मध्ये पेमेंट ऑफ बोनस एक्ट कायदा मंजूर झाला. त्यानंतर, बोनस हा कायदेशीर अधिकार बनला आणि आजही भारतात ही पद्धत सुरू आहे.
पेमेंट ऑफ बोनस एक्टनुसार, कंपन्यांना कर्मचाऱ्याच्या पगाराच्या किमान ८.३३ टक्के रक्कम बोनस म्हणून देणे आवश्यक आहे.
पेमेंट ऑफ बोनस एक्ट १९६५, २० किंवा त्याहून अधिक लोकांना रोजगार देणाऱ्या सर्व कारखान्यांना हा नियम लागू होतो. बोनस हा कर्मचाऱ्याच्या पगारावर आणि कंपनीच्या नफ्यावर आधारित केला जातो.