ठाणे महापालिकेच्या उपायुक्तांचे तडकाफडकी निलंबन, प्रशासकीय वर्तुळात खळबळ

Umesh Birari Suspension Reason In Thane Municipal Corporation: ठाणे महापालिकेचे उपायुक्त उमेश बिरारी यांना भूसंपादन प्रकरणातील कोट्यवधींच्या अनियमिततेमुळे निलंबित करण्यात आले. बोरिवलीतील जमीन व्यवहारात दर फुगवणे आणि नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप.
Suspended Thane Municipal Deputy Commissioner Umesh Birari amid allegations of large-scale land acquisition irregularities.
Suspended Thane Municipal Deputy Commissioner Umesh Birari amid allegations of large-scale land acquisition irregularities.saam tv
Published On

ठाणे महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त उमेष बिरारी यांच्यावर निलंबनाची मोठी कारवाई करण्यात आली आहे. बोरिवली तालुका परिसरातील भूसंपादन प्रकरणातील अनियमितता आणि कर्तव्यात कसूर केल्याचा प्राथमिक ठपका ठेवत त्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.

Suspended Thane Municipal Deputy Commissioner Umesh Birari amid allegations of large-scale land acquisition irregularities.
HSC SSC Result 2026 : दहावी-बारावीच्या निकालाची संभाव्य तारीख आली समोर, आताच करा नोट

बोरिवली तालुका हद्दीतील भूखंड क्रमांक ४५५, ४५६, ४५७, ४५७ (१ ते ३) आणि ४५८ या जमिनींच्या भूसंपादन प्रक्रियेत मोठे फेरफार झाल्याचे समोर आले आहे. जमिनीचा मोबदला निश्चित करताना प्रचलित जमिनीच्या दराऐवजी सदनिकांच्या (Flats) विक्री व्यवहाराचे दर ग्राह्य धरून अवास्तव मूल्यांकन करण्यात आले. वजावटीत भारग्रस्त जमिनीसाठी (Encumbered Land) नियमानुसार आवश्यक असलेली वजावट करण्यात आली नाही, ज्यामुळे सरकारी तिजोरीचे नुकसान झाले. जमिनीचे दर फुगवून संबंधित लाभार्थ्यांना अवाजवी फायदा मिळवून देण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

Suspended Thane Municipal Deputy Commissioner Umesh Birari amid allegations of large-scale land acquisition irregularities.
Mumbai News: बिर्याणीनंतर कलिंगड खाणं बेतलं जीवावर, एकाच कुटुंबातील ४ जणांचा संशयास्पद मृत्यू

पाच विभागांची जबाबदारी आणि वादग्रस्त कारकीर्द

उमेश बिरारी यांच्याकडे ठाणे महापालिकेच्या अत्यंत महत्त्वाच्या पाच विभागांची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र त्यांच्या कार्यकाळात अनेक वाद निर्माण झाले होते. केवळ भूसंपादनच नव्हे, तर शील फाटा परिसरातील अनधिकृत बांधकामांना अभय देण्यातही बिरारी यांचे नाव सक्रियपणे चर्चेत होते. या भागातील बेकायदा बांधकामांवर कारवाई न करता ती वाढू दिल्याचे आरोप त्यांच्यावर होत होते.

Suspended Thane Municipal Deputy Commissioner Umesh Birari amid allegations of large-scale land acquisition irregularities.
Mumbai Pune Missing Link: मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रवास फुकटात होणार; गेमचेंजर प्रकल्प कोणत्या महामार्गांना जोणार? महत्वाची अपटेड समोर

या गंभीर अनियमिततेची दखल घेत वरिष्ठ पातळीवरून बिरारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. या कारवाईमुळे ठाणे महानगरपालिकेत मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यास आणखी काही मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com