Thane : पाणी टंचाईदरम्यान ठाणे महापालिकेचा मोठा निर्णय, वाहनधारकांना बसणार फटका

Thane News : ठाण्यात वाढत्या उष्णतेमुळे पाणीटंचाई टाळण्यासाठी १० जूनपर्यंत वाहन धुण्यावर बंदी घालण्यात आली आहे. नागरिकांनी पाणी बचत करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Thane : पाणी टंचाईदरम्यान ठाणे महापालिकेचा मोठा निर्णय, वाहनधारकांना बसणार फटका
Thane NewsSaam Tv
Published On
Summary
  • ठाण्यात पाणीटंचाई टाळण्यासाठी वाहन धुण्यावर बंदी

  • १० जून २०२६ पर्यंत नियम लागू

  • धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे निर्णय

  • नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई

  • नागरिकांना पाणी बचतीचे आवाहन

विकास काटे, ठाणे

राज्यात उन्हाचा उकाडा हळूहळू वाढत चालला आहे. मुंबईसह अनेक शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांनी तळ गाठण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे यावर्षीचा मान्सून उशिरा असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अशातच पाणीटंचाई टाळण्यासाठी शहरातील सर्व सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुणे व इतर साफसफाईच्या कामांवर १० जून २०२६ पर्यंत निर्बंध घालण्यात असल्याचा निर्णय ठाण्याच्या महापौर ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी जारी केला आहे. तसेच महापौर आणि आयुक्त सौरभ राव यांनी नागरिकांना पाणी बचतीचे आणि पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वाढत्या तापमानामुळे धरणांतील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे. तसेच शहरातील विहिरी व कूपनलिकांची पाणीपातळीही खालावली आहे. यामुळे ठाणे शहरात पाण्याची कमतरता भासू नये म्हणून महापौर यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यांनी म्हटले आहे की, पाणी बचत करण्यासाठी प्रभावी उपाययोजना म्हणून सर्व्हिस सेंटरमध्ये दोन, तीन व चार चाकी वाहनांसह इतर वाहनांचे धुणे आणि साफसफाई तात्पुरती बंद करण्यात आली आहे.

Thane : पाणी टंचाईदरम्यान ठाणे महापालिकेचा मोठा निर्णय, वाहनधारकांना बसणार फटका
Maharashtra Weather: राज्यासाठी पुढचे २ दिवस महत्वाचे, वादळी वाऱ्यासह पाऊस अन् गारपिटीचा इशारा; आज कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट?

या आदेशाचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमांतर्गत संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. या परिस्थितीत नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केले आहे.

Thane : पाणी टंचाईदरम्यान ठाणे महापालिकेचा मोठा निर्णय, वाहनधारकांना बसणार फटका
Shocking : रुसून माहेरी गेलेल्या पत्नीला आणायला गेला, सासऱ्यांनी नकार दिला; रागात जावयाने सासरवाडी पेटवली

याशिवाय, सर्व व्यावसायिक आस्थापनांनी पाण्याचा अनावश्यक वापर टाळावा, पाण्याचा पुनर्वापर करण्यावर भर द्यावा आणि नियमांचे काटेकोर पालन करावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. घरगुती पातळीवरही पाणी बचतीच्या सवयी अंगीकाराव्यात. गाड्या धुणे, अंगण धुणे, नळ सुरू ठेवणे अशा पाणी वाया जाणाऱ्या सवयी टाळाव्यात असेही महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com