Maharashtra Weather: राज्यासाठी पुढचे २ दिवस महत्वाचे, वादळी वाऱ्यासह पाऊस अन् गारपिटीचा इशारा; आज कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट?

Maharashtra Weather News: राज्यामध्ये अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत आहे. राज्यात २४ एप्रिलपर्यंत वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिट होण्याचा इसारा हवामान खात्याने दिला आहे.
Maharashtra Weather: राज्यासाठी पुढचे २ दिवस महत्वाचे, वादळी वाऱ्यासह पाऊस अन् गारपिटीचा इशारा; कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट?
Maharashtra Weather NewsSaam Tv
Published On

Summary:

  • महाराष्ट्रासाठी पुढचे २ दिवस महत्वाचे

  • वादळी वाऱ्यासह पाऊसाचा इशारा

  • आजही राज्याताली अनेक जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढणार

एकीकडे राज्यातील तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. तर दुसरीकडे राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पाऊस झोडपून काढत आहे. वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस सध्या पडत आहे. यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. अशातच पुढचे २ दिवस राज्यासाठी महत्वाचे राहणार आहेत. आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान खात्याने या सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात २४ एप्रिलपर्यंत वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात २४ एप्रिलपर्यंत वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भात तापमान ४५ अंशांवर पोहोचले आहे. उकाड्याच्या पार्श्वभूमीवर अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

पुणे शहरासह जिल्ह्यासाठी पुढील चार दिवस येलो अलर्ट कायम आहे. पुणे शहरासह जिल्ह्यात सध्या हवामानाचा विरोधाभास पाहायला मिळत आहे. एकीकडे कमाल तापमानाने ४० पार केल्याने नागरिक उखाड्याने हैराण झाले आहे तर दुसरीकडे भारतीय हवामानशास्त्र विभागाने सलग चार दिवसांसाठी पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. एल -निनो च्या प्रभावामुळे कडक ऊन आणि ढगाळ वातावरण अशा दुहेरी कोंडीत पुणेकर अडकलेले आहेत. त्या संमिश्र हवामानाचा थेट फटका नागरिकांना बसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com