

ठाणे ते बोरिवली अवघ्या १८ मिनिटांत
दुहेरी बोगद्याचा विस्तार करणार
ठाणे खाडी किनाऱ्यापर्यंत जोडला जाणार
Thane Borivali Tunnel Project: ठाणे ते बोरिवली प्रवास आता सुसाट होणार आहे. अवघ्या १५ मिनिटात तुम्ही ठाणे ते बोरिवली प्रवास करु शकणार आहात. यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून ठाणे-बोरिवली दुहेरी बोगद्याचे काम हाती घेण्यात आले आह. हा बोगदाथेट ठाण्याला जोडणार आहे. कोलशेतपर्यंत जाता येणार आहे. यासाठी एमएमआरडीएने आणखी प्रकल्प हाती घेतला आहे. हा बोगदा ठाणे खाडी किनारा मार्गाशी जोडण्यात येणार आहे.
दुहेरी बोगदा
ठाणे ते बोरिवली या अंतरासाठी सध्या एक ते दीड तास प्रवास करावा लागते. ठाण्याहून बोरिवलीला जाण्यासाठी खूप जास्त वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. यामुळेच ठाणे-बोरिवली भूमिगत मार्गाचा प्रकल्प हाती घेतला आहे.या प्रकल्पाचे काम सुरु आहे. दुसरीकडे ठाण्यातील घोडबंदर मार्गावरदेखील वाहतूक कोंडी होते. यामुळेच आता हा बोगदा ठाणे खाडी किनारा मार्गापर्यंत नेण्यात येणार आहे.
भुयारी मार्ग कसा असणार? (Thane-Borivali Tunnel Extension)
ठाणे-बोरिवली भूमिगत मार्ग ११.८ किमी लांबीचा असणार आहे. यामध्ये १०.५ किमी लांबीचे दोन बोगदे आहेत. हे बोगदे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालन जाणार आहे. हा सहा मार्गिकांचा एक मार्ग असणार आहे. या प्रकल्पासाठी एकूण १८ हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. एका बाजूने तीन मार्गिका, एका बाजूने तीन मार्गिका असणार आहे. यातील दोन मार्गिका या वाहतूकीसाठी असणार आहे तर मार्गिका आपत्कालीनसाठी असणार आहे.
कसा असणार मार्ग?
खारेगाव ते गायमुख हा १३.१४ किमी लांब मार्ग असणार आहे. यासाठी ३३०० कोटींपेक्षा जास्त रुपयांचा खर्च येऊ शकतो. या मार्गात एक उड्डाणपुल, भुयारी मार्ग आणि स्टील्ट रस्ता बांधला जाणार आहे. खारेगाव ते गायमुख असा मार्ग असणार आहे. या मार्गात बाळकुम, कोलशेत, वाघबीळ, ओवळा, कासारवडवली, मोघरपाडा ही ठिकाणे जोडली जाणार आहेत.
ठाणे बोरिवली बोगदा आणि ठाणे खाडी किनारा मार्गाचे काम सुरु आहे. २०२८ पर्यंत या दोन्ही मार्गांचे काम पूर्ण करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. त्यातच सरकारने दुहेरी बोगद्याचा विस्तार करण्याचे ठरवले आहे. बोगदा आणि खाडी किनारा मार्गाची जोडणी केली जाणार आहे. त्यासाठी उन्नत रस्ता बांधला जाणार आहे. हा रस्ता टिकुजी-नी वाडी ते कोलशेत असणार आहे.
बोरिवली ते ठाणे अवघ्या १८ मिनिटात
दुहेरी बोगद्यामुळे ठाणे ते बोरिवली अंतर १५ मिनिटांत पार पडता येणार आहे. यामुळे ठाणेकरांना खूप फायदा होणार आहे. हा उन्नत रस्ता जोडला गेल्याने तुम्ही ठाणे ते बोरिवलीला जाता येणार आहे.हा प्रकल्प सुरु होण्यासाठी अजून किती वेळ लागणार आहे याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. निविदा प्रक्रिया झाल्यानंतरच वेळ कळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.