पक्षाच्या कामकाजात अनावश्यक हस्तक्षेप सहन केला जाणार नाही; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा कडक इशारा

sunetra pawar speech : सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पक्षातील नेत्यांनाही कडक इशारा दिला.
sunetra pawar news
sunetra pawar Saam tv
Published On
Summary

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात सुनेत्रा पवार भावुक

पक्षाच्या कामकाजात अनावश्यक हस्तक्षेप सहन केला जाणार नसल्याचेही पवारांकडून स्पष्ट

संजय गडदे, साम टीव्ही

सुनेत्रा पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनी आयोजित कार्यक्रमातून पक्षाची आगामी वाटचाल आणि भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कामकाजात अनावश्यक हस्तक्षेप सहन केला जाणार नाही, असा शब्दात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी इशारा दिला. सुनेत्रा पवार यांनी भर सभेतून पक्षाच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचेही संकेत दिलेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पक्षहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला. पक्षाच्या अनावश्यक हस्तक्षेप सहन केला जाणार नसून आवश्यकतेनुसार कठोर भूमिका घेतली जाईल,असा इशारा त्यांनी दिला.

sunetra pawar news
Sunetra Pawar : भाषणं होतील, मेळावे होतील, पण प्रत्येक क्षणी...; सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट व्हायरल

सुनेत्रा पवार भाषणात म्हणाल्या की, अजित पवार यांनी सर्वांना मान-सन्मान आणि जबाबदाऱ्या दिल्या आहेत. यापुढे पक्षाच्या हिताला प्राधान्य दिले जाईल. कोणाचाही अनावश्यक हस्तक्षेप आढळल्यास त्याची दखल घेतली जाईल. दादा जसे कठोर निर्णय घेत होते. तसे निर्णय घेण्यास मीही मागे हटणार नाही'.

कार्यकर्त्यांना आवाहन करताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, 'मला कठोर भूमिका घेण्याची वेळ येणार नाही, अशी अपेक्षा आहे'. यावेळी सुनेत्रा पवार यांनी महामंडळावरील नियुक्तांबाबतही महत्वाचं भाष्य केलं.

महामंडळांवरील नियुक्त्यांबाबत बोलताना सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले की, पक्षासाठी केलेले समर्पण, त्याग आणि पक्षवाढीत दिलेले योगदान हेच निकष असतील. केवळ किती वर्षे पक्षात काम केले यापेक्षा त्या काळात पक्ष किती वाढला, याला अधिक महत्त्व दिले जाईल. पक्षवाढीसाठी नव्याने जोडल्या गेलेल्या व्यक्तींचा योग्य सन्मान राखला जाईल'.

sunetra pawar news
राज्य सरकारच्या महामंडळांवर कोणाची नियुक्ती करणार? सुनेत्रा पवारांनी केली मोठी घोषणा|VIDEO

पक्षाच्या विचारसरणीवर भाष्य करताना सुनेत्रा पवार पुढे म्हणाल्या, 'आम्ही विचारांशी कधीही तडजोड केलेली नाही आणि यापुढेही केली जाणार नाही'. सुनेत्रा पवारांनी या भाषणातून पक्ष संघटनेत शिस्त, कार्यक्षमतेला प्राधान्य आणि पक्षनिष्ठेला महत्त्व देण्याचा स्पष्ट संदेश दिल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com