राज्य सरकारच्या महामंडळांवर कोणाची नियुक्ती करणार? सुनेत्रा पवारांनी केली मोठी घोषणा|VIDEO

Sunetra Pawar Statement On Maharashtra Corporation Appointments: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन कार्यक्रमात सुनेत्रा पवार यांनी महामंडळ नियुक्त्यांबाबत मोठी घोषणा केली. प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 27 व्या वर्धापन दिनानिमित्त पक्षातर्फे मुंबईत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी भाषण केले. भाषणादारम्यान अजित पवार यांचे नाव घेताच सुनेत्रा पवार ह्या भावुक झाल्याचे दिसून आले. सुनेत्रा पवार भावुक झाल्याचे दिसताच कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या स्मरणार्थ अमर रहे अशा घोषणा दिल्या. दरम्यान महामंडळाच्या नियुक्त्या अद्याप बाकी असून यावर सुनेत्रा पवार म्हणाल्या, मी आदरणीय दादांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्त्याची निष्ठा, परिश्रम आणि समर्पण माझ्या लक्षात आहे. योग्य वेळी प्रत्येकाला न्याय आणि संधी मिळेल याची खात्री मी सर्वांना देते असा विश्वास सुनेत्रा पवारांनी उपस्थितांना दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com