Shocking : संतापजनक! चॉकलेटचं आमिष दाखवून घरात बोलवलं, शेजाऱ्याकडून ७ वर्षीय मुलावर अत्याचार

Crime News Ambernath: चॉकलेटचं आमिष दाखवून शेजाऱ्याकडून ७ वर्षीय मुलावर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडालीये.
Ambernath News
AmbernathSaam tv
Published On

अंबरनाथ : राज्यात लैंगिक अत्याचाराच्या घटना थांबायचं नाव घेईना. महिला, तरुणींसोबत लहान मुले देखील सुरक्षित नसल्याचे समोर येत आहे. शहापुरातील १३ वर्षीय मुलीवर अत्याचाराची झाल्याची घटना ताजी असताना अंबरनाथमध्येही संतापजनक प्रकार घडला आहे. अंबरनाथच्या प्रकाश नगरमध्ये ७ वर्षीय मुलावर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने अंबरनाथ परिसरात खळबळ उडाली आहे.

अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत संतापजनक घटना घडली आहे. अंबरनाथमध्ये एका ७ वर्षीय मुलावर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. बरनाथच्या बारकूपाडा परिसरातील प्रकाश नगर झोपडपट्टीत हा संतापजनक प्रकार घडला आहे. ७ वर्षीय मुलासोबत रविवारी भयंकर कृत्य घडलं आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत नोंदवण्यात आलं आहे.

Ambernath News
Tragic Accident : देवदर्शनावरून परतताना काळाचा घाला; भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ८ जणांचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथच्या बारकूपाडा परिसरातील प्रकाश नगर झोपडपट्टीत २० एप्रिल रोजी हा संतापजनक प्रकार घडलाय. प्रकाश नगरात एक ७ वर्षांचा मुलगा घराबाहेर खेळत होता. त्याचवेळी त्याच्यावर शेजारी राहणाऱ्या नराधमाची नजर पडली. या नराधमाने त्याला चॉकलेट आमिष देऊन घरात बोलवलं. त्यानंतर नराधमाने ७ वर्षीय मुलावर अत्याचार केला.

Ambernath News
Maharashtra Politics : ठाकरे बंधूंनंतर आणखी एक नवे समीकरण? केंद्रीय मंत्र्यांची ऑफर, महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप येणार

घटनेची माहिती मिळताच मुलाच्या आई-वडिलांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी या नराधमाविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या घटनेनंतर पोलिसांकडून नराधमाचा शोध सुरू करण्यात आला आहे.

Ambernath News
Terror attack in jammu and kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला

दरम्यान, शहापूरच्या वालशेतमध्ये १३ वर्षीय भयंकर घटना घडली आहे. गणवेश देतो, आधारकार्ड देतो आणि दोन हजार रुपये मिळतील असे आमिष देऊन एकाने आदिवासी पाड्यातील मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पडघा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. या घटनेने पडघा परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com