Maratha Reservation: मुख्यमंत्री शिंदे खोटे बोलण्यात वस्ताद, दुतोंडी सरकारच्या ढोंगाचा बुरखा फाटला; ठाकरे गटाचा हल्लाबोल

Saamana- Editorial on Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून सरकारवर टीका करण्यात आली आहे.
Shiv Sena Uddhav Thackeray group criticizes Shinde Fadnavis government over Maratha reservation
Shiv Sena Uddhav Thackeray group criticizes Shinde Fadnavis government over Maratha reservationSaam TV
Published On

Saamana- Editorial on Maratha Reservation: जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराच्या घटनेचे राज्यात तीव्र पडसाद उमटले. ठिकठिकाणी मराठा संघटनांनी बंद पुकारत शिंदे फडणवीस-पवार सरकारचा निषेध केला. यानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीसांनी सोमवारी तातडीने पत्रकारपरिषद घेत शासनाची भूमिका स्पष्ट केली. इतकंच नाही, तर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आंदोलकांची माफी देखील मागितली. (Latest Marathi News)

Shiv Sena Uddhav Thackeray group criticizes Shinde Fadnavis government over Maratha reservation
National Parties Wealth: कोरोना काळात राष्ट्रीय पक्षांना अच्छे दिन, भाजपच्या संपत्तीत वेगाने वाढ; काँग्रेसची मालमत्ता किती?

आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार असंही सरकारकडून सांगण्यात आलं. त्याचबरोबर आंदोलकांशी चर्चा करण्याचे प्रयत्न आहे, लवकरच हा मुद्दा आपण सोडवून असंही स्पष्ट करण्यात आलं. दरम्यान, याच मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून सरकारवर टीका करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री शिंदे म्हणतात, मराठा समाजाच्या वेदनांची मला पूर्ण जाण आहे. मुख्यमंत्री हे खोटे बोलण्यात वस्ताद आहेत. आधी तुमची पोपटपंची बंद करा व जालन्यातील मराठा आंदोलकांवर गोळय़ा चालवण्याचे, अमानुष लाठीमार करण्याचे आदेश कोणी दिले ते सांगा, असा सवाल सामना अग्रलेखातून उपस्थित करण्यात आला आहे.

तुम्ही खरे मराठा! एका तोंडाने आंदोलकांवर लाठय़ा–गोळय़ा चालवायचे आदेश द्यायचे व दुसऱ्या तोंडाने मला तुमच्या वेदनांची जाण आहे, असे सांगायचे हे ढोंग आहे. जालन्याच्या आंतरवाली गावातील मनोज जरांगे–पाटलांनी शिंदे–फडणवीस–पवार या दुतोंडी सरकारच्या ढोंगाचा बुरखा फाडला आहे, असा टोलाही सामनातून सरकारला लगावण्यात आला आहे.

Shiv Sena Uddhav Thackeray group criticizes Shinde Fadnavis government over Maratha reservation
Maratha Reservation Explainer: मराठा आरक्षणाचा प्रश्न नेमका कुठे रखडलाय?

जालन्याच्या आंतरवाली गावात एक सर्वसामान्य कार्यकर्ता जिद्दीने त्याच्या समाजासाठी उपोषणाला बसला आहे. त्याने प्राण पणास लावले आहेत व खोकेवाल्या सरकारपुढे तो झुकायला तयार नाही. मराठा आरक्षणाचा सरकारी आदेश म्हणजे ‘जीआर’ हातात पडत नाही तोवर आंदोलन मागे घेणार नाही, असा दम जरांगे-पाटलांनी सरकारला भरला असल्याचं सामना अग्रलेखात मांडण्यात आलं आहे.

भाजपचे आमदार नितेश राणे काँग्रेस पक्षात असताना जे म्हणाले तेच खरे, फडणवीस मराठय़ांना आरक्षण देणार नाहीत. हे हाफ चड्डीवाल्यांचे सरकार आहे. राणे आज भाजपात आहेत. त्यांचे तेच मत कायम असावे, पण त्या हाफ चड्डीवाल्या सरकारची नाडी एका सामान्य जरांगे-पाटलांनी खेचली तेव्हा त्यांच्यावर निर्घृण हल्ला केला, अशी टीकाही सामनातून सरकारवर करण्यात आली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com