शिंदे गटाच्या नेत्याला मुंबईत अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

Shivam Dubey Accused Of Physical Assault On Marriage Promise In Mumbai: लग्नाचे आमिष दाखवून तीन वर्षे लैंगिक अत्याचार केल्याचा आणि लाखो रुपये तसेच ४५ लाखांची कार घेतल्याचा आरोप असलेल्या शिवम दुबे याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली.
SHINDE SENA YOUTH LEADER SHIVAM DUBEY ARRESTED IN ANDHERI CASE
SHINDE SENA YOUTH LEADER SHIVAM DUBEY ARRESTED IN ANDHERI CASEsaam tv
Published On: 

संजय गडदे, साम टीव्ही

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर तीन वर्षे लैंगिक अत्याचार केल्याचा, तसेच तिच्याकडून लाखो रुपये आणि तब्बल ४५ लाख रुपयांची महागडी कार घेतल्याचा आरोप असलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या युवा नेत्याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. शिवम दुबे ऊर्फ चोंग्या असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. उत्तर प्रदेशातील एका तरुणीशी आरोपीने साखरपुडा केल्याची माहिती मिळाल्यानंतर पीडित तरुणीने पोलिसांत धाव घेतल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शिवम दुबे याचे पीडित तरुणीशी गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. लग्न करण्याचे आश्वासन देऊन त्याने अंधेरी परिसरातील विविध हॉटेलमध्ये तरुणीशी शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे. या काळात त्याने तरुणीकडून अनेकदा पैसे घेतले. तसेच तिला ४५ लाख रुपये किमतीची कार भेट देण्यास भाग पाडल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

SHINDE SENA YOUTH LEADER SHIVAM DUBEY ARRESTED IN ANDHERI CASE
फ्री फायरच्या आयडीवरून वाद अन् थेट गळ्यावर चाकू; घटनेने खळबळ

दरम्यान, आरोपीने उत्तर प्रदेशातील दुसऱ्या तरुणीशी साखरपुडा केल्याची माहिती पीडितेला मिळाली. त्याचे लग्नही मे महिन्यात होणार असल्याचे समजताच आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने तिने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी गुन्हा दाखल करून शिवम दुबेला अटक केली.

SHINDE SENA YOUTH LEADER SHIVAM DUBEY ARRESTED IN ANDHERI CASE
तर मंत्र्यांना दिवाळी साजरी करू देणार नाही; शिंदेंचा सरकारला मोठा इशारा|VIDEO

राजकीय दबाव आणल्याचा आरोप

शिवम दुबे हा शिंदे गटाचा युवा नेता असून, स्थानिक माजी नगरसेवक कमलेश राय आणि एका नगरसेवकाशी त्याचे जवळचे संबंध असल्याचे सांगितले जाते. पीडित तरुणीने तक्रार दाखल करू नये, यासाठी स्थानिक राजकीय नेत्यांनी तिच्यावर दबाव आणल्याचा आरोपही करण्यात आला आहे. मात्र, या दबावाला न जुमानता तरुणीने पोलिसांत तक्रार दिली.

SHINDE SENA YOUTH LEADER SHIVAM DUBEY ARRESTED IN ANDHERI CASE
रशियाचा युक्रेनमधील भारतीय औषध कंपनीवर हल्ला; 400 कोटी रुपयांचं नुकसान

यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती

शिवम दुबे याच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात यापूर्वीही विविध गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. २०२३ मध्ये त्याच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली होती. मात्र, नंतर राजकीय दबावामुळे तडीपारी रद्द झाल्याचा दावा केला जात आहे. तडीपारी रद्द झाल्यानंतर अंधेरीतील एका बारमध्ये एका तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याचाही आरोप असून, याप्रकरणी अंधेरी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

आरोपीच्या वाढदिवसानिमित्त पीडित तरुणीने अंधेरीतील पेनिन्सुला हॉटेलमध्ये पार्टी आयोजित केल्याची माहितीही समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, आरोपीविरोधातील आरोपांची सत्यता तपासातून स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com