

युक्रेनच्या सुमी शहरातील कुसुम ग्रुपच्या फार्मा प्लांटवर रशियन ड्रोन हल्ला झाला.
हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.
प्लांटच्या मुख्य इमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा फटका आता भारतीय उद्योगांनाही बसतोय. युक्रेनमधील 'सुमी' (Sumy) शहरात असलेल्या 'कुसुम ग्रुप' या प्रमुख भारतीय औषध निर्मिती कंपनीच्या एका मोठ्या प्रकल्पावर रशियाने ड्रोनने हल्ला केलाय. या भीषण हल्ल्यात एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अनेक कर्मचारी जखमी झालेत. या ड्रोन हल्ल्यामुळे या प्रकल्पाच्या मुख्य इमारतीचा मोठा भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय. हल्ला इतका भयान होता की आकाशात उठलेले धुराचे लोट दूरपर्यंत दिसत होते.
हाती आलेल्या माहितीनुसार, युद्धाच्या अत्यंत धोकादायक परिस्थितीतही, 'कुसुम ग्रुप'चा हा प्रकल्प अविरतपणे कार्यरत होता. जीवनावश्यक औषधांचा पुरवठा करत होता. प्राथमिक अंदाजानुसार, या हल्ल्यात प्रकल्पाचे सुमारे ४०० कोटी रुपयांचे प्रचंड नुकसान झाले आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार, सध्या ढिगारा हटवण्याचे काम सुरू असून जीवितहानीच्या आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी 'X' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून या हल्ल्याचा तीव्र निषेध केलाय.
भारतीय नागरिक राजीव गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील 'कुसुम ग्रुप'ने १९९४ मध्ये औषध वितरक म्हणून आपल्या कामकाजास सुरुवात केली. २००२ नंतर, कंपनीने आपले लक्ष स्वतःचे ब्रँड्स विकसित करण्यावर आणि त्यांच्या विपणनावर केंद्रित केले. या समूहाने २००७ मध्ये भारतात आणि २००९ मध्ये युक्रेनमधील सुमी (Sumy) येथे मोठे उत्पादन प्रकल्प उभारले. सध्या ही कंपनी ५० हून अधिक उत्पादनांची निर्मिती करते. उझबेकिस्तान, कझाकस्तान व फिलीपिन्ससह नऊहून अधिक देशांमध्ये औषधांची निर्यात करते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.