eknath shinde new s
Maharashtra Politics Saam tv

Maharashtra Politics : 'मी हिंदू आहे, परंतु...'; एकनाथ शिंदेंना थेट पत्र, फायरब्रँड महिला नेत्याने शिवसेना सोडली

Maharashtra Politics news : एकनाथ शिंदेंना थेट पत्र लिहून फायरब्रँड महिला नेत्या शिल्पा बोडखे यांनी शिवसेना सोडली आहे. शिल्पा बोडखे यांच्या राजीनाम्याने शिंदे गटाला मोठा धक्का दिला आहे.
Published on

मुंबई : विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. पक्षातील महिला नेत्या शिल्पा बोडखे यांनी शिंदे गटाची साथ सोडली आहे. पक्षाच्या प्रवक्ता आणि पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुखपदाचा अधिकृतपणे राजीनामा देत महिला नेत्याने शिंदे गटाला रामराम ठोकला आहे. शिल्पा बोडखे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

शिल्पा बोडखे म्हणाल्या, 'नागपूरमध्ये पूर्व विदर्भाची जबाबदारी मनीषा कांयदे यांना देण्यात आली होती. तर मला पश्चिम विदर्भाच्या संपर्कप्रमुख म्हणून कामाची जबाबदारी दिली. तेव्हापासून ठाकरे गटात मला पूर्व विदर्भाची जबाबदारी दिली होती. तेव्हापासून मनीषा कायंदे यांना माझा राग होता. आता आमदार झाल्याने पुन्हा पक्षात राहून काम करताना त्रास होईल. तसेच वाचाळवीर आणि हिंदुत्व या दोन्ही विषयामुळे मी पदाची जबाबदारी सोडत आहे.

शिल्पा बोडखे यांनी पत्रात काय म्हटलं?

शिल्पा बोडखे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून खदखद मांडली. 'आपण राज्यात विकासात्मक काम करतोय. आपण महायुती म्हणून सरकार चालवत आहोत. सरकार चालवताना तिन्ही पक्षांना हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करताय. परंतु पक्षातील काही वाचाळवीर वाट्टेल त्या भाषेत दुसऱ्यावर टीका करतात. कधी धार्मिक तेढ निर्माण होईल, कोणाच्या भावना दुखावतील, याचा देखील विचार करत नाहीत. आपल्याला शिकवलेल्या हिंदुत्वात दुसऱ्यांचा द्वेष करायला शिकवले जाते का? असा सवाल शिल्पा बोडखे यांनी उपस्थित केला.

eknath shinde new s
Sharad Pawar On Eknath Shinde: "मी कृषी मंत्री असताना कधी निर्यात शुल्क ४०% लावले नव्हते..."; CM शिंदेंच्या टीकेवर शरद पवारांचं प्रत्युत्तर

'मी देखील हिंदू आहे. परंतु माझ्यावर झालेल्या संस्कारात प्रत्येकाचा आदर करणे प्रत्येक समाजाचा सन्मान राखणे आणि राजकारणात मतमेद असावे पण मनभेद असू नये, असे शिकवले आहे. हीच आपल्या महाराष्ट्र राज्याची संस्कृती आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून वाचाळवीर नेत्याच्या वक्तव्याची चीड येते. त्यांच्या वक्तव्याने तुमच्या कामाला कुठे तरी तडा जात आहे. वाचाळवीरांना आवर घालण्यापेक्षा त्यांचे नेते जिलेबी सारखा घुमजाव करत त्यांच्या वक्तव्याचे समर्थन करताना दिसतात. त्यामुळे अशा वातावरणात काम करण्याची मनापासून इच्छा होत नाही. त्यामुळे मी शिवसेना प्रवक्ता आणि पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा देत आहे, असे त्या पुढे म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com