Akshay Shinde Encounter: स्वसंरक्षण की हत्या? अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर विरोधकांचा सरकारला सवाल

Varsha Gaikwad On Akshay Shinde: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर पोलिसांनी स्वतःच्या बचावासाठी गोळीबार केला की, ही हत्या होती? असे प्रश्न विरोधकांकडून विचारण्यात येत आहेत.
स्वसंरक्षण की हत्या? अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर विरोधकांचा सरकारला सवाल
Varsha Gaikwad On Akshay ShindeSaam Tv
Published On

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा आज पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला आहे. अक्षयने पोलिसांची बंदूक हिसकावून त्यांच्यावर गोळीबार केला. यावेळी स्वतःचा बचाव करताना झालेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. यावरच आता विरोधी पक्षांकडून प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. यातच काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही घटना संशयास्पद असल्याचं म्हटलं आहे.

काय म्हणाल्या वर्षा गायकवाड?

वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत की, ''एखाद्या हायप्रोफाईल प्रकरणातील आरोपीला ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जात असताना सहसा अनेक पोलीस कर्मचारी बरोबर असतात. पोलिसांच्या गरड्यात असताना बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे पोलिसांचे पिस्तूल हिसकावून पोलिसांवरच गोळ्या झाडतो, यावर कुणाचा विश्वास बसेल? आणि ते जरी घडलं असेल तर पोलिसांनी त्याला आटोक्यात आणून का पकडता आलं नाही? हे संपूर्ण प्रकरण अत्यंत गंभीर आणि संशयास्पद आहे. पोलीस आणि राज्याच्या गृहखात्यात नक्की चाललंय तरी काय?''

स्वसंरक्षण की हत्या? अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर विरोधकांचा सरकारला सवाल
Akshay Shinde: अक्षय शिंदेची आत्महत्या नाही एन्काऊंटर, सेल्फ डिफेन्समध्ये पोलिसांचा गोळीबार; नेमकं काय घडलं? वाचा...

गायकवाड म्हणाल्या की, ''बदलापूर प्रकरणात याआधीच पोलिसांवर प्रकरण दडपण्याचे, गुन्हा नोंदवण्यास उशीर करण्याचे गंभीर आरोप झालेले आहेत. या प्रकरणातील शाळेचे संस्थापक तुषार आपटे यांचे भाजपाशी संबंध असून तो अजूनही फरार आहे. त्याला अजून पोलीस का पकडू शकले नाहीत? आरोपीच्या आईने आणि भावाने दिलेले जवाब कसं दुर्लक्षित करता येतील?''

त्यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिलं आहे की, ''जागच्या जागी हे संपूर्ण प्रकरण दडपण्यासाठी आणि या प्रकरणाचे धागे दोरे ज्यांच्या दिशेने जात आहेत त्यांना संरक्षण देण्यासाठी तर अक्षय शिंदेची हत्या करण्यात आलेली नाही ना? याची सीबीआय मार्फत चौकशी झाली पाहिजे.''

स्वसंरक्षण की हत्या? अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर विरोधकांचा सरकारला सवाल
Akshay Shinde Encounter: बदलापूर प्रकरपणातील आरोपी अक्षय शिंदे नेमका कोण? वाचा

'देवेंद्र फडणीस यांनी राजीनामा दिला पाहिजे'

वर्षा गायकवाड म्हणाल्या, ''राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा तीन तेरा वाजलेत, पण राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री हे सत्ताकारणात व्यग्र आहेत. खरं तर या प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणीस यांनी राजीनामा दिला पाहिजे.''

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com