Sanjay Raut : ...तर PM मोदी यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागेल; संजय राऊत असे का म्हणाले?

संजय राऊत राऊत यांनी 'सामना' मुखपत्रातील 'रोखठोक' या सदरातून मोदी सरकारवर हल्लाबोल करत पेगाससचा वापर सुरूच असल्याचा दावा केला आहे.
Sanjay Raut/Narendra Modi
Sanjay Raut/Narendra ModiSaam TV
Published On: 

Sanjay Raut News : मोदी सरकारने पेगासस या स्पायवेअरचा वापर करून देशातील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते,मंत्री आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांवर पाळत ठेवल्याचा दावा २०२१ साली काही आंतरराष्ट्रीय माध्यमांनी केला होता. यावरून विरोधकांनी मोदी सरकारला धारेवर धरलं होतं. तर पेगासस हेरगिरी प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर चौकशीचे आदेश दिले होते.

दरम्यान, याच पेगासस हेरगिरी प्रकरणावरून खासदार संजय राऊत राऊत यांनी 'सामना' मुखपत्रातील 'रोखठोक' या सदरातून मोदी सरकारवर हल्लाबोल करत पेगाससचा वापर सुरूच असल्याचा दावा केला आहे. (Latest Marathi News)

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पेगासस हेरगिरी प्रकरणावरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. 'इस्रायलच्या कंपनीस कंत्राट देणारे व त्यांना अर्थपुरवठा करणारे याच देशातले प्रमुख उद्योगपती आहेत. पेगासस या हेरगिरी करणाऱ्या उपकरणाचा वापर आजही आपल्या देशात सुरू आहे व या पेगॅससचे जनक इस्रायल आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

'विरोधी पक्षाने पेगाससचा विषय अधांतरी सोडला. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, प्रमुख राजकीय नेते व उद्योगपतींवर आजही पेगाससच्या माध्यमातून पाळत ठेवली जात आहे. संघ परिवाराशी संबंधित भाजप नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी एक मागणी पुन्हा केली. ते म्हणतात, 'पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना तात्काळ पदावरून हटवले पाहिजे. त्यांनी अनेकदा मूर्ख बनवले आहे, असे संजय राऊत पुढे म्हणाले.

Sanjay Raut/Narendra Modi
Ajit Pawar : गिरीश बापट यांना प्रचारासाठी आणल्याने अजित पवारांनी व्यक्त केला संताप; म्हणाले...

'पेगासस टेलिफोन टॅपिंग हे त्याचे उत्तम उदाहरण. वॉशिंग्टनमधून डोवाल यांचे आणखी एक भयंकर प्रकरण लवकरच उघड होणार आहे. मोदी यांनी वेळीच पावले उचलली नाहीत तर 2023 च्या मध्यास मोदी (Narendra Modi) यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागेल, असाही दावा संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत पुढे म्हणाले, 'डॉ. स्वामी हे हवेत तीर मारणारे नेते नाहीत. जगभरातील यंत्रणांशी त्यांचा संवाद आहे व त्यातून ते महत्त्वाची माहिती समोर आणतात. आता 'द गार्डियन'ने प्रसिद्ध केलेली हेरगिरी व निवडणूक हेराफेरीची माहिती व डॉ. स्वामी यांनी टाकलेला नवा बॉम्ब याची सांगड घालणे गरजेचे आहे, असे संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut/Narendra Modi
Amol Kolhe : खासदार अमोल कोल्हेंचा CM शिंदेंना अल्टिमेट...; पुढील वर्षी शिवनेरीवर कायमस्वरुपी भगवा न दिसल्यास उचणार मोठं पाऊल

'मोदी व भारतीय जनता पक्षाचे 'अर्थमंत्री' गौतम अदानी यांच्यावर हिंडेनबर्ग रिपोर्टचा फेकलेला बॉम्ब ही साधी गोष्टी नाही. तेव्हापासून अदानी समूह कोसळला तो उठला नाही व त्यातून मोदी यांचा चेहरा हा पाहण्यासारखा झाला. संसदेत ते जगाने पाहिले. निवडणूक प्रक्रियेत 'ईव्हीएम'च्या माध्यमातून हेराफेरी सुरू आहे हा विरोधकांचा आरोप कायम आहे. डॉ. स्वामी यांनी दावा केला की, ‘वॉशिंग्टन'मधून लवकरच नवा धमाका होईल. निवडणूक घोटाळय़ासंदर्भात हा धमाका असलाच तर आश्चर्य वाटू नये, असा इशारा संजय राऊत यांनी मोदी सरकारला दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.