Ajit pawar News
Ajit pawar NewsSaam tv

Ajit Pawar : गिरीश बापट यांना प्रचारासाठी आणल्याने अजित पवारांनी व्यक्त केला संताप; म्हणाले...

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी कित्येक दिवसांपासून आजारी असलेले गिरीश बापट यांना पोटनिवडणुकीच्या प्रचारात आणल्याने भाजपवर संताप व्यक्त केला.
Published on

Ajit Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी कित्येक दिवसांपासून आजारी असलेले गिरीश बापट यांना पोटनिवडणुकीच्या प्रचारात आणल्याने भाजपवर संताप व्यक्त केला. 'आजारी गिरीश बापट यांना तुम्ही निवडणुकीत वापरून घेता. तुम्हाला लाज वाटली पाहिजे, अशा शब्दात अजित पवार यांनी भाजपवर संताप व्यक्त केला.

चिंचवड विधानसभा पोट निवडणुकीतील महा विकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या प्रचारासाठी पिंपळे निलख भागात अजित पवार हे जाहीर सभा घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश टोपे आणि शशिकांत शिंदे हे या जाहीर सभेत उपस्थित होते. तसेच या जाहीर सभेत भाजपचे माजी युवा नगरसेवक तुषार कामटे आणि त्याच्या शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.

Ajit pawar News
Maharashtra Politics: ठाकरे गटाची पुढची रणनिती ठरली! प्रमुख नेते ऍक्टिव्ह होणार; लोकांच्या भावना...

प्रचार सभेत चिंचवडमधील नागरिकांना अजित पवार (Ajit Pawar) यांनी सत्ताधाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला. 'पवना धरणाच पाणी पिंपरी चिंचवड भागात यायला पाहिजे. जे त्या भागतील शेतकरी आहे, त्यांना देखील पाणी मिळालं पाहिजे. मात्र, पवना पाईप लाईन प्रश्न अजूनही रखडून आहे. ज्याच्या अंगात पाणी नाही, ते या पिंपरी चिंचवडमधील जनतेला पाणी कसं देतील, असा सवाल अजित पवार यांनी केला.

प्रचार सभेत आजारी गिरीश बापट (Girish Bapat) यांना प्रचार सभेत आणण्यावरून भाजपवर अजित पवार यांनी संताप व्यक्त केला. 'आजारी गिरीश बापट यांना तुम्ही निवडणुकीत वापरून घेता. तुम्हाला लाज वाटली पाहीजे, असे म्हणत अजित पवार यांनी भाजपवर टीका केली. अजित पवार पुढे म्हणाले, आगामी महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने महापालिकेत केलेल्या भ्रष्टाचराची सर्व प्रकरण आपल्या पुढे ठेवणार आहे'.

'यांना भीती वाटत आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणुकीत हे पाच पैकी चार जागा हरले. त्यामुळे निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत, अशी टीकाही अजित पवार यांनी भाजपवर केली.

'पंतप्रधानानी मागे मेट्रोच उद्घाटन केलं. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दोन ठिकाणी केलं. मात्र किती जण मेट्रोत प्रवास करतात. मेट्रोत प्रवास करण्या ऐवजी लोक तिथे फक्त वाढदिवस साजरा करण्यासाठी मेट्रो वापरत आहेत, असे अजित पवार म्हणाले.

Ajit pawar News
Amit Shah: 'मुख्यमंत्री बनण्यासाठी त्यांनी...' अमित शहांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; 2024 च्या निवडणुकीचे फुंकले रणशिंग

'नाना यांच्याकडून काम करून घेण्याची माझी आहे. अण्णा आणि नाना पिंपरी-चिंचवडमध्ये काम करणार आहेत. मी या दोघ्यांच्या मध्ये आहे, असे अजित पवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com