Amit Shah: 'मुख्यमंत्री बनण्यासाठी त्यांनी...' अमित शहांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; 2024 च्या निवडणुकीचे फुंकले रणशिंग

युतीच्या सर्व जागा 2024 च्या निवडणुकीत जिंकून आणायच्या... अमित शहांचं पुण्यात आवाहन
Amit Shah
Amit Shah Saam TV
Published On

Pune: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे तीन दिवसीय महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. नागपुरातील कार्यक्रम आटोपल्यानंतर शहा हे पुण्यात दाखल झाले आहेत. विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर आहेत. रात्री 'मोदी @20' पुस्तकाच्या निमित्तने अमित शाह यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केल.

यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर भाष्य करताना उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. (Latest Marathi News)

Amit Shah
Breaking News : अमित शाहांच्या ताफ्यात शिरली संशयास्पद व्यक्ती! पुण्यातील धक्कादायक प्रकार

यावेळी अमित शाह यांनी निवडणूक आयोगाच्या कालच्या निकालावरही प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेचं पक्षचिन्ह आणि नाव एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले. त्यावर बोलतांना अमित शाह म्हणाले की, "निवडणूक आयोगाने दूध का दूध आणि पाणी का पाणी केलं आहे." त्यामुळे आता राज्यातील सर्व लोकसभेच्या जागा जिंगण्यचा आपल्याला निर्धार करायचा आहे, असे म्हणत त्यांनी 2024 च्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले.

Amit Shah
Maharashtra Politics: ठाकरे गटाची पुढची रणनिती ठरली! प्रमुख नेते ऍक्टिव्ह होणार; लोकांच्या भावना...

ठाकरेंवर केला हल्लाबोल...

यावेळी बोलताना अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. "काल एक निर्णय झाला आणि एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव मिळाले. मागच्या वेळी आम्ही निवडणूक एकत्र लढली पण मुख्यमंत्री पदासाठी त्यांनी विरोधी पक्षांचे तळवे चाटले," असा घणाघात अमित शाह यांनी ठाकरेंवर केला आहे.

"आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजप युती म्हणून लढेल, जे धोका देतात त्यांना कधी क्षमा केली नाही पाहिजे, असं अपिल मी कार्यकर्त्यांना करायला आलो आहे, असं अमित शाह (Amit Shah) म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com