Ambernath: धावती लोकल पकडणं तरूणाच्या जीवाशी; जागा पकडण्यासाठी धावला अन् लोकलच्या मधल्या फटीत अडकला

Ambernath Train Station Incident Highlights Dangers of Boarding Moving Trains: धावती लोकल पकडण्याच्या प्रयत्नात एका प्रवाशाचा तोल गेला आणि तो थेट प्लॅटफॉर्म आणि लोकलच्या मधल्या फटीत अडकला.
Ambernath
AmbernathSaam
Published On

अंबरनाथ स्थानकावर एक धक्कादायक अपघात घडला आहे. लोकल पकडण्याचा प्रयत्न एका प्रवाशाला चांगलंच महागात पडलं आहे. वेगात असलेल्या लोकलमध्ये चढताना तरूणाचा तोल जाऊन तो थेट प्लॅटफॉर्म आणि लोकलच्या मधल्या फटीत अडकला आहे. या दुर्घेटनेत तो गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी लोकलमध्ये एका तरूणाचा अपघाती मृत्यू झाला होता. आता असाच काहीसा अपघात अंबरनाथ स्थानकावर घडला. या घटनेमुळे धावती ट्रेन पकडणं किती धोकादायक आहे, पुन्हा एकदा समोर आले आहे.

अंबरनाथवरून सकाळी ७ वाजून ५१ मिनिटांनी सीएसएमटीसाठी फास्ट लोकल रवाना होते. ही लोकल अंबरनाथच्या यार्डातून प्लॅटफॉर्म नंबर ३ वर येत असताना एक प्रवासी धावती लोकल पकडण्यासाठी धावला. मात्र, लोकलचा वेग अधिक असल्याने त्याचा तोल गेला आणि तरूण खाली पडला. तरूण धावती लोकल पकडताना प्लॅटफॉर्मच्या गॅपमध्ये पडला.

Ambernath
Malegaon: धक्कादायक! १० वीची परिक्षा दिली अन् काही दिवसांतच विहिरीत उडी मारून आयुष्य संपवलं; परिसरात खळबळ

यादरम्यान, लोकलचे २ ते ३ डबे त्याच्या अंगावरून पुढे गेले. त्यानंतर आरपीएफच्या जवानांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली आणि त्या प्रवाशाला वाचवण्याचा प्रयत्न केला. आरपीएफने त्याला बाहेर काढत उपचारासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केलं. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती आहे.

Ambernath
Shivsena: धक्कादायक! अल्पवयीन मुलीचा विनयभंग; ठाकरे गटाच्या नेत्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा

ही घटना स्पष्टपणे दाखवते की, चालत्या लोकलध्ये चढण्याचा धोका किती मोठा असू शकतो. केवळ जागेच्या घाईसाठी आपलं आणि इतरांचा आयु्ष्य धोक्यात घालणं किती घातक ठरू शकतं, याचं हे गंभीर उदाहरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com