Shivsena
ShivsenaSaam

Shivsena: धक्कादायक! अल्पवयीन मुलीचा विनयभंग; ठाकरे गटाच्या नेत्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा

Shiv Sena Leader Booked Under POCSO for Molesting Minor: अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिवसेनेचे उपविभाग प्रमुख अनंत पाताडे यांच्या विरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
Published on

मुंबईतील कांजूरमार्गमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे उपविभाग प्रमुख अनंत पाताडे यांच्या विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १७ मार्चला अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला होता. याच प्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१७ मार्चला विनयभंग झाल्यानंतर पीडितेने याची माहिती आपल्या पालकांना दिली. मुलीच्या पालकांनी थेट कांजूरमार्ग पोलीस ठाण्याच जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्राथमिक चौकशीनंतर अनंत पाताडे यांच्याविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

Shivsena
Satara News: बेपत्ता चिमुकलीचा शेतातच मृतदेह सापडला, अपघात की घातपात? ५ वर्षीय मुलीसोबत नेमकं काय घडलं?

नेमकं प्रकरण काय?

कांजूरमार्ग येथे एका अल्पवयीन मुलीची विनयभंग करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. मुलगी १७ वर्षांची असून, हा विनयभंग शिवसेना ठाकरे गटाचे उपविभाग प्रमुख अनंत पाताडे यांनी केला असल्याचा आरोप पीडित मुलीने केला आहे. १७ मार्चला विनयभंग झाल्यानंतर पीडित मुलीने याची माहिती आपल्या पालकांना दिली.

Shivsena
Dombivli : डोंबिवलीत रिक्षा बंद; वाहतूक पोलीस- रिक्षाचालकांमधील वाद चिघळला

पालकांनी थेट कांजूरमार्ग पोलीस ठाणे गाठत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या घटनेची चौकशी केली. चौकशी केल्यानंतर पोलिसांनी अनंत पाताडे यांच्या विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे. या धक्कादायक प्रकारानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com