Dombivli : डोंबिवलीत रिक्षा बंद; वाहतूक पोलीस- रिक्षाचालकांमधील वाद चिघळला

Rickshaw Drivers vs Traffic Police: डोंबिवली पश्चिम भागात वाहतूक पोलिसांच्या मनमानी कारभाराविरोधात रिक्षाचालकांचा संताप उफाळून आला असून, डोंबिवली रिक्षा चालक-मालक युनियनने आज सकाळी अकरा वाजता रिक्षा बंद आंदोलन पुकारले.
Dombivali Auto
Dombivali AutoSaam
Published On

अभिजीत देशमुख, साम टीव्ही

डोंबिवली पश्चिम भागात वाहतूक पोलिसांच्या मनमानी कारभाराविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश पाहायला मिळाला आहे. डोंबिवली रिक्षा चालक-मालक युनियनने आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास आंदोलन पुकारले आहे. त्यांनी रिक्षा बंदची हाक दिली. या आंदोलनाला ठाकरे गटाने पाठिंबा दर्शवत सक्रिय सहभाग घेतला आहे.

रिक्षा चालकाने पुकारलेल्या आंदोलनाला ठाकरे गटाने पाठिंबा दिला आहे. यावेळी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. डोंबिवली पश्चिम परिसरात वारंवार तक्रारी निवेदने देऊनही बेकायदेशीर रिक्षा चालकांवर कारवाई होत नसल्याचा आरोप या रिक्षा चालकांनी केला आहे.

Dombivali Auto
Nitesh Rane: "कुणालाही सोडणार नाही, साहेबांना जेवणाच्या ताटावरून उठवलं अन्.." नीतेश राणेंचा भरसभेत ठाकरेंना इशारा

डोंबिवली पश्चिममध्ये वाहतूक पोलीस तैनात नसतात. अनेक जण बेकादेशीररित्या विनापरवाना विना बॅच रिक्षा चालवतात. मात्र वाहतूक पोलीस जाणीवपूर्वक कानाडोळा करत असल्याचा आरोप रिक्षा चालकांनी केला आहे. आज सकाळी वाहतूक विभागाचे एसीपी आंदोलनकर्त्यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले होते.

Dombivali Auto
Prasanna Shankar: वेश्यांसोबत शारीरिक संबंध, गरोदरपणात वेदनादायी सेक्स; प्रसन्नवर दिव्याने काय काय आरोप केलेत?

मात्र, एसीपींनी या आंदोलनाकडे पाठ फिरवल्याने रिक्षाचालक संतापले. वाहतूक पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबाजी आंदोलनकर्त्यांनी केली स्टेशन परिसरात रिक्षा बंदची हाक दिली .स्टेशन परिसरात रिक्षा बंदची हाक देण्यात आल्याने प्रवाशांचे मात्र चांगलेच हाल झाल्याचे पाहायला मिळाले. सध्या डोंबिवली पश्चिममध्ये रिक्षा बंद असून, कधी सुरू होणार? असा प्रवाशांमध्ये निर्माण झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com