Nitesh Rane: "कुणालाही सोडणार नाही, साहेबांना जेवणाच्या ताटावरून उठवलं अन्.." नीतेश राणेंचा भरसभेत ठाकरेंना इशारा

NItesh Rane On Thackeray: नारायण राणेंना अटक करतानाचा व्हिडिओ अजूनही मोबाईलमध्ये सेव्ह. वेळ आल्यावर परतफेड करेन; नीतेश राणेंचा ठाकरेंना इशारा.
Nitesh Rane
Nitesh RaneSaam Tv
Published On

मंत्री झाल्यानंतर नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंविरोधात वादग्रस्त विधान केलं होतं. यानंतर राणेंना रत्नागिरीतून अटक करण्यात आली होती. जेवणाच्या ताटावरून उठवून त्यांना अटक झाली होती.

या घटनेची आठवण आज त्यांचे पुत्र मंत्री नितेश राणे यांनी वडिलांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात उपस्थित सभागृहासमोर करून दिली. "त्या अटकेचा क्षण आजही माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवलेला आहे. ज्या दिवशी परतफेड करेन, त्याच दिवशी तो व्हिडिओ डिलीट करेन. कुणालाही सोडणार नाही", असा थेट इशारा राणे यांनी ठाकरे गटाला दिला आहे.

परतफेड केल्यावरच व्हिडिओ डिलीट करेन

"साहेबांना जेवणाच्या ताटावरून उठवलं आणि त्यांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेला तो क्षण मी अजूनही माझ्या कॅमेऱ्यामध्ये सेव्ह करून ठेवलेला आहे. ज्या दिवशी त्याची परतफेड करेन, त्या दिवशीच डिलीट करेन. सगळ्यांचा हिशोब होणार. कारण राणे साहेबांना ज्यांनी त्रास दिला, ते कुठेही सुटत नाही. एवढं विश्वासाने मी सांगतो", असा इशारा नीतेश राणेंनी भरसभेत दिला.

Nitesh Rane
Nitesh Rane: "कुणालाही सोडणार नाही, साहेबांना जेवणाच्या ताटावरून उठवलं अन्.." नीतेश राणेंचा भरसभेत ठाकरेंना इशारा

त्यांचं आमच्याशी कधीच वैर नव्हतं

नितेश राणे पुढे म्हणाले, "दहा वर्षांच्या प्रवासात खूप काही पाहिलं. तसेच अनुभवलं. सिंधुदुर्गाचे पालकमंत्री दीपक केसरकर असताना त्यांच्या आशीर्वादाने दोडामार्ग जेल देखील पाहिला. मात्र, त्यांनी लोकसभेला आम्हाला साथ दिली. त्यामुळे त्या जुन्या आठवणी पुसल्या गेल्या आहेत. तिसऱ्या कुणालातरी खुश करण्यासाठी केसरकर यांनी ते केलं होतं. त्यांचं आमच्याशी कधीच वैर नव्हतं", असंही नीतेश राणे म्हणाले.

Nitesh Rane
Washim Crime: अनैतिक संबंधाचा संशय, झोपलेल्या पत्नीच्या गळ्यावरून विळा फिरवला; नंतर स्वत:लाही संपवलं

नारायण राणेंना अटक का झाली होती?

नारायण राणे केंद्रीय मंत्री असताना त्यांना अटक करण्यात आली होती. २३ ऑगस्ट २०२१ रोजी त्यांना अटक करण्यात आली होती. जेवणाच्या ताटावरून उठवून त्यांना अटक झाली होती. नारायण राणे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल विधान केलं होतं.

महाडमध्ये एका पत्रकार परिषदेत नारायण राणे म्हणाले, "स्वातंत्र्या दिनाबद्दल ज्यांना माहिती नाही, त्यांनी फार काही बोलू नये. त्यांना स्वातंत्र्य दिन कोणता माहिती नाही. मी असतो, तर त्या दिवशी कानशिलात लगावली असती", असे विधान राणेंनी केलं होतं.

नारायण राणेंनी केलेल्या विधानानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. राणे जेवण करत असतानाच पोलीस आले आणि त्यांनी राणेंना अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com