किरकोळ वाद चिघळला, रिक्षाचालकाला तरुणांकडून बेदम मारहाण; घटना सीसीटीव्हीत कैद

Rickshaw Driver Beaten By Youth Group Near Kalyan Railway Station: कल्याण रेल्वे स्थानकासमोर किरकोळ वादातून रिक्षाचालकावर तरुणांच्या गटाकडून मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Rickshaw driver assaulted by a group of युवths near Kalyan railway station; entire incident captured on CCTV camera.
Rickshaw driver assaulted by a group of युवths near Kalyan railway station; entire incident captured on CCTV camera.saam tv
Published On

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याण रेल्वे स्थानकासमोरील परिसरात शुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात तरुणाच्या गटाकडून रिक्षाचालकाला मारहाण केल्याचा आरोप असून, संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Rickshaw driver assaulted by a group of युवths near Kalyan railway station; entire incident captured on CCTV camera.
नाष्टा, सहलीपासून घरखर्चापर्यंत प्रत्येक गोष्टीत व्यवहार! "टीटीएम" च्या हिशोबाला कंटाळून पुण्यातील दाम्पत्याचा घटस्फोट

कल्याण स्टेशन परिसरात रिक्षाचालक आणि काही तरुणामध्ये सुरुवातीला शाब्दिक वाद झाला. मात्र, काही वेळातच हा वाद चिघळला आणि तरुणाच्या गटाने रिक्षाचालकाला भर रस्त्यात मारहाण केल्याचे केल्याचे दिसत आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच महात्मा फुले पोलीस ठाणे येथील पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, त्याच्या आधारे संबंधित व्यक्तींची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Rickshaw driver assaulted by a group of युवths near Kalyan railway station; entire incident captured on CCTV camera.
मार्कशीटच नाही, लिव्हिंगही नाही! मराठी शाळेतील नववी, दहावीचे वर्ग बंद; ६० विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला

कल्याण स्टेशन परिसरात चोरी, लूटमार, मारामारी आणि प्रवाशांना त्रास देणाऱ्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची तक्रार नागरिकांकडून वारंवार केली जात आहे. गर्दीच्या या भागात सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या घटनेमुळे कल्याण स्टेशन परिसरातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com