Vastu Shastra: सासरच्या मंडळींकडून पुरुषांनी या गोष्टी भेट म्हणून कधीच घेऊ नयेत; आर्थिक परिस्थिती बिघडू शकते

Marriage Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार लग्नानंतर काही वस्तू सासर किंवा माहेरातून स्वीकारणं अशुभ मानलं जातं. इलेक्ट्रॉनिक वस्तू, काळे कपडे, धारदार वस्तू आणि भंगार घरात नकारात्मक ऊर्जा वाढवू शकतात आणि आर्थिक तसेच मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो.
marriage
marriageGoogle
Published On

वास्तुशास्त्र आपल्याला घर आणि नातेसंबंधांबद्दल अशा अनेक गोष्टी सांगतं, ज्यांचा व्यक्तीच्या सुख, समृद्धी आणि आर्थिक परिस्थितीवर परिणाम होतो. असं म्हटलं जातं की, लग्नानंतर काही वस्तूंची देवाणघेवाण काळजीपूर्वक विचार करूनच केली पाहिजे.

मुलांनी सासरच्या मंडळींकडून वस्तू स्वीकारणं किंवा मुलींनी विनाकारण किंवा विनामूल्य माहेरून वस्तू स्वीकारणं हे विशेषतः अशुभ मानण्यात येतं. असं केल्याने आर्थिक समस्या, मानसिक ताण आणि ग्रहांचा प्रभाव निर्माण होऊ शकतो. पुरुषांनी सासरच्या मंडळींकडून भेट म्हणून कोणत्या वस्तू चुकूनही घेऊ नयेत, हे जाणून घ्या.

इलेक्ट्रॉनिक वस्तू

वास्तुशास्त्रानुसार, इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा संबंध राहू ग्रहाशी मानला जातो. त्यामुळे, जर एखाद्या व्यक्तीला सासरच्या मंडळींकडून विनामूल्य इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळाल्या तर राहू दोष वाढू शकतो. यामुळे खर्चात अचानक वाढ होऊ शकते आणि आर्थिक सुस्थितीवर परिणाम होऊ शकतो.

काळ्या रंगाच्या वस्तू

काळा रंग शनिदेवाशी संबंधित आहे. असं मानलं जातं की, सासरच्या मंडळींकडून काळे कपडे किंवा चादरी भेट म्हणून मिळाल्यास जीवनातील तणाव वाढू शकतो. तसंच यामुळे कामात व्यत्यय आणि मानसिक ताण येऊ शकतो.

marriage
Office Desk Vastu: नोकरीत नवी संधी आणि प्रमोशन मिळत नाहीये? ऑफिसच्या डेस्कवरून या गोष्टी लगेच काढून टाका

झाडू

झाडू हे देवी लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. वास्तुशास्त्रानुसार, महिलांनी माहेरून झाडू आणून सासरच्या घरी वापरू नये. असं केल्याने कुटुंबाच्या समृद्धी आणि आनंदावर परिणाम होऊ शकतो.

या गोष्टींबाबत काळजी घ्या

महिलांनी माहेरून चाकू, कात्री किंवा कोणतीही धारदार वस्तू आणू नये. यामुळे नात्यांमध्ये तणाव आणि कटुता वाढू शकते. याशिवाय सासरच्या घरातून जड लोखंडी वस्तू स्वीकारणं देखील अशुभ मानण्यात येतं. कारण त्यामुळे अपघात किंवा अडचणींचा धोका वाढू शकतो.

marriage
Vastu Tips: घरातील या चुका गरिबीचं मोठं कारण ठरू शकतात, देवी लक्ष्मी होईल नाराज

जुन्या वस्तू आणि भंगार

वास्तुशास्त्रानुसार, महिलांनी माहेरून जुनी पेपर, कचरा किंवा निरुपयोगी पुस्तकं आणू नयेत. यामुळे घरात पसारा वाढतो आणि नकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

marriage
Office Desk Vastu: नोकरीत नवी संधी आणि प्रमोशन मिळत नाहीये? ऑफिसच्या डेस्कवरून या गोष्टी लगेच काढून टाका

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com