नाष्टा, सहलीपासून घरखर्चापर्यंत प्रत्येक गोष्टीत व्यवहार! "टीटीएम" च्या हिशोबाला कंटाळून पुण्यातील दाम्पत्याचा घटस्फोट

Pune IT Couple Divorce Due To Expense Sharing Disputes: पुण्यातील आयटी दाम्पत्याचा "टीटीएम" म्हणजेच खर्च वाटून घेण्याच्या पद्धतीमुळे संसार तुटला. प्रत्येक खर्चाचा हिशोब ठेवण्यावरून वाढलेले मतभेद अखेर घटस्फोटात संपले.
“A Pune IT couple’s marriage ended in divorce after constant disputes over splitting every expense equally.”
“A Pune IT couple’s marriage ended in divorce after constant disputes over splitting every expense equally.”Saam tv
Published On

पुणे: "तुझं तू, माझं मी" म्हणजेच सोप्या आणि बोली भाषेत टी टी एम एम या आर्थिक फंड्याच्या अवलंबनामुळे एका आयटी दाम्पत्याच्या संसाराला कौटुंबिक न्यायालयाने पूर्णविराम दिला. हो, ही घटना घडलीय पुण्यात. नाष्ट्याच्या बिलापासून भेटवस्तूंच्या खर्चापर्यंत प्रत्येक गोष्टीचा अर्धा वाटा मागणाऱ्या पतीमुळे वाढलेले मतभेद न्यायालयाच्या दरवाज्यात पोहचला. प्रेम, विश्वास आणि आपुलकीपेक्षा या प्रकरणात खर्चाचा हिशेबच महत्त्वाचा ठरला अन् संसाराचा शेवट घटस्फोटात झाला.

“A Pune IT couple’s marriage ended in divorce after constant disputes over splitting every expense equally.”
मार्कशीटच नाही, लिव्हिंगही नाही! मराठी शाळेतील नववी, दहावीचे वर्ग बंद; ६० विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला

पती आणि पत्नी हे दोघेही आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत. २०२३ मध्ये दोघांचे लग्न झाले पण काही महिन्यात आर्थिक बाबींवरून त्यांच्यात वाद सुरू झाले. पतीचे उत्पन्न पत्नीपेक्षा अधिक होता मात्र तो प्रत्येक खर्चाचा काटेकोर हिशेब ठेवत होता. अगदी नाष्टा जेवणापासून, फिरण्यासाठी गेलेल्या ट्रिप, आणि इतर कौटुंबिक खर्चाची त्याच्याकडं नोंद होती.

“A Pune IT couple’s marriage ended in divorce after constant disputes over splitting every expense equally.”
Pune Crime: पुणे हादरले! स्नूकर खेळताना खुन्नस दिली, रागाच्या भरात तरुणांनी मित्रालाच संपवलं

प्रत्येक खर्चामध्ये पत्नीने अर्धा वाटा उचलावा, असा त्याचा आग्रह होता. तसेच, पत्नी माहेरी आर्थिक मदत करते, या संशयावरून वारंवार वाद होत होते. मतभेद वाढत गेल्याने नात्यात दुरावा निर्माण झाला आणि गेल्या वर्षभरापासून त्यांच्यात वैवाहिक संबंधही राहिले नाही. अखेर त्यांनी परस्परसंमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com