Raj thackeray: ठाकरे बंधूंचा एल्गार! ४ ऑक्टोबरचा संयुक्त मोर्चा कुठून कुठपर्यंत निघणार? राज ठाकरेंनी सर्वकाही सांगितलं

Raj thackeray On March: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे येत्या ४ ऑक्टोबर रोजी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात मोर्चा काढणार आहेत. या मोर्चाबाबत त्यांनी पत्रकार परिषद घेत महत्वाची माहिती दिली.
Raj thackeray: ठाकरे बंधूंचा एल्गार! ४ ऑक्टोबरचा संयुक्त मोर्चा कुठून कुठपर्यंत निघणार? राज ठाकरेंनी सर्वकाही सांगितलं
Raj thackeray On MarchSaam Tv
Published On: 
  • राज ठाकरे- उद्धव ठाकरे यांचा ४ ऑक्टोबर रोजी संयुक्त मोर्चा

  • ठाकरे बंधूंचा मोर्चा भायखळा ते सीएसएमटी असा असणार आहे

  • उद्धव ठाकरे- राज ठाकरे यांचा ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात एल्गार

  • मोर्चात सहभागी होण्याचे सर्वपक्षीय नेत्यांना आवाहन

भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात ठाकरे बंधूंनी एल्गार पुकारला आहे. ठाकरे बंधू येत्या ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात संयुक्त मोर्चा काढणार आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी या आज संयुक्त पत्रकार परिषद घेत मोर्चाबाबत महत्वाची माहिती दिली. राज ठाकरे यांनी हा मोर्चा कुठून निघणार आणि कुठपर्यंत जाणार याबाबत अपडेट दिले. ठाकरे बंधूंचा हा मोर्चा भायकळा येथून निघणार असून तो सीएसएमटीपर्यंत जाणार आहे. त्याठिकाणी त्यांची सांगता सभा होणार आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले की, '४ तारखेला ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार असेल. निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात हा मोर्चा असेल. ४ तारखेला सकाळी १० वाजता मोर्चा निघेल. भायखळा ते सीएसटीपर्यंत हा संयुक्त मोर्चा निघणार आहे. जेजे उड्डाण पुलावरून हा मोर्चा जाणार आहे.क्रुडास कंपनी ते सीएसएमटी असा या मार्चाचा मार्ग असेल. मुंबई महानगर पालिकेसमोर सांगता सभा होईल. सर्वच राजकीय पक्षांना आम्ही आमंत्रण देणार आहोत. सत्ताधारी पक्षातील नेत्यांना या व्यासपीठावर यायचे असेल तर ते येऊ शकतात.'

Raj thackeray: ठाकरे बंधूंचा एल्गार! ४ ऑक्टोबरचा संयुक्त मोर्चा कुठून कुठपर्यंत निघणार? राज ठाकरेंनी सर्वकाही सांगितलं
Raj Thackeray: मोठं होऊन पत्रकार होणार का? राज ठाकरेंच्या प्रश्नावर 'त्या' चिमुकल्या मुलींनी दिलं असं उत्तर; ऐकून मनसे अध्यक्षही चकीत

तसंच, 'या मोर्चात कुठल्याही राजकीय पक्षांचे झेंडे नसणार आहेत. सगळ्यांच्या हातात तिरंगा असणार आहे. ज्यांच्याकडून जेजे काही गोष्ट होईल ते करावे. अजेंडा एकच आहे तो कुणीही कसाही राबवावा. हा काय स्पर्धेचा विषय नाही आहे. फोनवरून आम्ही अनेक राजकीय नेत्यांना मोर्चासाठी आमंत्रण देणार आहोत. ४ तारखेनंतर पुढे काय करायचे हे आम्ही बसून ठरवू आणि त्यानंतर सर्वांना सांगू.', असे राज ठाकरे यांनी सांगितले.

Raj thackeray: ठाकरे बंधूंचा एल्गार! ४ ऑक्टोबरचा संयुक्त मोर्चा कुठून कुठपर्यंत निघणार? राज ठाकरेंनी सर्वकाही सांगितलं
Raj Thackeray : भाजपच्या बड्या नेत्याकडून राज ठाकरेंचा अपमान, वादग्रस्त वक्तव्याने राजकारण तापणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com