राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना धक्का, छावा संघटनेला ही हादरा; बड्या नेत्यासह 350 कार्यकर्त्यांनी हाती घेतला मनसेचा झेंडा

Raj Thackeray Political Move In South Ratnagiri: राज ठाकरे यांची मोठी राजकीय खेळी! दक्षिण रत्नागिरीतील छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष धावडे यांच्यासह 350 कार्यकर्त्यांनी अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला.
RAJ THACKERAY'S BIG MOVE
RAJ THACKERAY'S BIG MOVEsaam tv
Published On: 

गणेश कानडे, साम टीव्ही

राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या ही चर्चा सुरू आहे. या सगळ्या घडामोडी घडत असताना राज ठाकरे यांनी मोठी खेळी खेळत एकनाथ शिंदे यांना धक्का दिला आहे. तसेच छावा संघटनेच्या 350 कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला आहे. यामध्ये शिंदे गटातील अनेक महत्वाच्या पदाधिकाऱ्यांचाही समावेश असल्याची माहिती आहे. मनसेचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला.

RAJ THACKERAY'S BIG MOVE
Water Crisis: चिंता वाढली! राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी घट, फक्त ६४.१७ टक्के पाणीसाठा शिल्लक

आज दुपारी एक वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या शिवतीर्थ येथे अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. यावेळी छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष धावडे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मनसेचा झेंडा हाती घेतला.

RAJ THACKERAY'S BIG MOVE
C Section Delivery: सिझेरियन प्रसूतींवर सरकारची नजर; आता प्रत्येक ऑपरेशनचं सांगावं लागणार कारण

दक्षिण रत्नागिरीतील छावा संघटनेने मनसेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याने आगामी काळात जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, येत्या काही दिवसांत आणखी महत्त्वाचे पक्षप्रवेश होणार असल्याचे संकेतही यावेळी देण्यात आले आहेत. त्यामुळे दक्षिण रत्नागिरीत मनसेची ताकद वाढवण्यासाठी अमित ठाकरे यांनी मोर्चेबांधणी सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.