Raj Thackeray: राज्यात 1972 पेक्षाही भंयकर दुष्काळ; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतला मोठा निर्णय

Maharashtra Navnirman Sena: महाराष्ट्रातील भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यंदाचा दीपोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच दिवाळीत फटाके आणि रोषणाईवर नियंत्रण ठेवून उत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.
Raj Thackeray
Raj Thackeraysaam tv
Published On: 

महाराष्ट्रातील दुष्काळाची भीषण परिस्थिती आणि त्याचा सर्वसामान्य नागरिकांना बसणारा फटका लक्षात घेता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यंदाचा दीपोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील 72 पेक्षा जास्त भागांमध्ये दुष्काळाचे संकट असताना रोषणाई आणि फटाक्यांची आतषबाजी करत उत्सव साजरा करणं योग्य नसल्याचं मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलंय.

महाराष्ट्र सध्या भीषण दुष्काळाच्या परिस्थितीतून जातोय. राज्यातील १९७२ पेक्षाही दुष्काळाची गंभीर परिस्थिती असताना उत्सव साजरा करणं योग्य नसल्याचे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलंय. याच पार्श्वभूमीवर मनसेकडून दरवर्षी आयोजित करण्यात येणारा दीपोत्सव यंदा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील नागरिक दुष्काळामुळे होरपळत असताना मोठ्या उत्साहात दीपोत्सव साजरा करणं आपल्याला पटत नसल्याचे राज ठाकरे म्हणाले.

Raj Thackeray
Breaking News : आता निवडणूक लढणार नाही, थेट मुख्यमंत्री होणार, विधानसभेआधी बड्या नेत्याची घोषणा

काय म्हणाले राज ठाकरे?

राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्र एका कठीण परिस्थितीतून जात असताना दीपोत्सव साजरा करणं योग्य नाही. राज्यातील दुष्काळाच्या परिस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांनी बोलायला हवं होतं. मात्र बहुतेक सत्ताधारी पक्षांना राज्यातील परिस्थिती कळली नसावी म्हणून ते गरबा खेळण्यात व्यस्त राहिले. राज्यातील परिस्थिती अशीच राहिल्यास असंख्य तांडे गावांमधून बाहेर पडतील आणि शहरांच्या दिशेने येतील.

पुढे राज ठाकरे म्हणाले की, सर्वांना माझी नम्र विनंती आहे की, आपल्याला काळी दिवाळी साजरी करायची नाही. मात्र उत्साहाला कुठेतरी आवर घालणं गरजेचं आहे. फटाके फोडताना आणि रोषणाई करताना प्रत्येकाने स्वतःवर नियंत्रण ठेवायला हवं. आपण महाराष्ट्राचे नागरिक आहोत आणि महाराष्ट्रातील नागरिकांबद्दल आपल्या सर्वांच्या मनात प्रचंड प्रेम आहे. राज्यातील नागरिक अशा पद्धतीने दुष्काळाच्या झळा सोसत असताना आपण उत्सव साजरा करणे योग्य वाटत नाही.

Raj Thackeray
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! माजी आमदारासह जिल्हाप्रमुख अन् तालुकाप्रमुखांचा 'जय महाराष्ट्र'; शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

दिवाळीत कंदील लावावेत आणि फराळ वाटावा, मात्र रोषणाई आणि फटाके फोडण्यावर आवर घालावा, असं राज ठाकरे म्हणाले. यंदा उत्सवाचा उत्साह काहीसा कमी ठेवण्याची गरज असून, पुढील वर्षी आणखी मोठ्या उत्साहात दीपोत्सव साजरा करूया, असे आवाहनही त्यांनी केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.