Railway News : रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! दादरपर्यंत थांबणाऱ्या 'या' ३ ट्रेन आता सीएसएमटीपर्यंत धावणार

Central Railway News : सीएसएमटी पुनर्विकासाच्या कामादरम्यान मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! ७५ दिवसांच्या ब्लॉकमध्येही तीन गाड्या सीएसएमटीपर्यंत धावणार असून अमरावती-मुंबई एक्स्प्रेसच्या प्रवाशांनाही दिलासा मिळणार आहे.
Railway News
Railway News AI Image
Published On: 
Summary
  • मध्य रेल्वेचा मोठा निर्णय

  • लांब पल्ल्याच्या तीन गाड्या ब्लॉक काळातही सीएसएमटीपर्यंत धावणार

  • १ ऑक्टोबर ते १५ डिसेंबरदरम्यान पुनर्विकासाची कामे सुरू राहणार

  • प्रवाशांची गैरसोय कमी होणार

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील पुनर्विकासाच्या कामामुळे रेल्वे प्रवाशांना होणारी गैरसोय लक्षात घेऊन मध्य रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १ ऑक्टोबर ते १५ डिसेंबर या ७५ दिवसांच्या ब्लॉक कालावधीत दादर स्थानकापर्यंतच चालवण्यात येणाऱ्या ३ गाड्या आता पूर्वीप्रमाणे सीएसएमटीपर्यंत धावणार आहेत. यामुळे मुंबईकडे प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या गाड्यांमध्ये जळगावमार्गे धावणाऱ्या अमरावती-मुंबई एक्स्प्रेसचाही समावेश आहे.

सीएसएमटीच्या पुनर्विकासासाठी विशेष ब्लॉक

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या पुनर्विकास प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात विविध पायाभूत सुविधांची कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामांमध्ये प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १५ तसेच स्टेबलिंग लाइन क्रमांक १५ वरील कामांचा समावेश आहे. ही कामे सुरक्षितपणे आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेकडून विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉकमुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने सुरुवातीला काही लांब पल्ल्याच्या गाड्या सीएसएमटीऐवजी दादर स्थानकापर्यंतच चालवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे प्रवाशांना दादरला उतरून पुढे पर्यायी वाहतुक शोधावी लागण्याची शक्यता होती.

Railway News
Tea Tips : चहा रोज प्यायला आवडत असेल तर, 'या' ६ चुका अजिबात करू नका; नाहीतर वाढेल कॅन्सरचा धोका

प्रवाशांच्या गैरसोयीमुळे निर्णयात बदल

दादरपर्यंतच गाड्या चालवल्यामुळे प्रवाशांची होणारी धावपळ, वेळेचा अपव्यय आणि पर्यायी वाहतुकीचा खर्च लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने आपल्या निर्णयात बदल केला आहे. त्यानुसार, संबंधित तीन गाड्या आता ब्लॉक कालावधीतही सीएसएमटीपर्यंत धावणार आहेत. या निर्णयाचा विशेष फायदा मुंबई आणि जळगाव मार्गावरील प्रवाशांना होणार आहे. अमरावती-मुंबई एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही थेट सीएसएमटीपर्यंत पोहोचता येणार असल्याने त्यांची गैरसोय कमी होण्यास मदत होईल.

Railway News
Vastu Shastra : पैशांचं लॉकर घरातील 'या' बाजूला असावी, अन्यथा घरी येईल दारिद्र्य; वास्तू शास्त्र काय सांगतं, जाणून घ्या

प्रवाशांनी काय काळजी घ्यावी?

सीएसएमटीच्या पुनर्विकासाचे काम सुरू असताना रेल्वेच्या वेळापत्रकात आणि गाड्यांच्या संचालनात बदल होऊ शकतात. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी संबंधित गाडीचे अद्ययावत वेळापत्रक आणि थांबे मध्य रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर तपासावेत.पुनर्विकासाची कामे सुरू असतानाच प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी घेतलेल्या या निर्णयामुळे रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com