Alisha Khedekar
वास्तूनुसार तिजोरी उत्तर दिशेला ठेवणे शुभ मानले जाते. यामुळे घरातील धनवृद्धीसाठी सकारात्मक ऊर्जा वाढते, अशी मान्यता आहे.
तिजोरी ईशान्य कोपऱ्यात ठेवणे शक्यतो टाळावे. हा भाग पूजेसाठी योग्य मानला जातो आणि तिथे जड वस्तू नकोत.
घरात उत्तर दिशा शक्य नसल्यास तिजोरी पश्चिम दिशेला ठेवण्याचा सल्ला वास्तूशास्त्रात दिला जातो, अशी पारंपरिक धारणा आहे.
तिजोरीचा दरवाजा उत्तर किंवा पूर्व दिशेकडे उघडेल, अशा पद्धतीने तिजोरी ठेवणे वास्तूनुसार शुभ मानले जाते.
तिजोरी बेडरूममध्ये ठेवत असाल तर ती नैऋत्य भागात ठेवावी, मात्र तिचा दरवाजा उत्तर दिशेला उघडावा.
तिजोरीत काही ना काही मौल्यवान वस्तू, चांदीचे नाणे किंवा धन ठेवण्याची परंपरा आहे. याला समृद्धीचे प्रतीक मानले जाते.
सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा