लॉजमध्ये तरुणीची निर्घृण हत्या; मृतदेहाची अवस्था पाहून पोलिसही हादरले

Woman Murdered In Lodge In Lonere Raigad: रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे येथे लॉजमध्ये तरुणीची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या. आरोपी फरार असून गोरेगाव पोलीस तपास करत आहेत.
Police and forensic teams investigate the crime scene after a young woman was brutally murdered in a lodge in Lonere, Raigad.
Police and forensic teams investigate the crime scene after a young woman was brutally murdered in a lodge in Lonere, Raigad.saam tv
Published On

सचिन कदम, साम टीव्ही

रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका लॉजिगमध्ये एका तरुणीची धारधार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Police and forensic teams investigate the crime scene after a young woman was brutally murdered in a lodge in Lonere, Raigad.
Nashik : खरातनंतर नाशिकमध्ये आणखी एक कांड, नामांकित कंपनीत महिलांवर लैंगिक अत्याचार अन्...

मिळालेल्या माहितीनुसार, माणगाव तालुक्यातील लोणेरे येथील एका लॉजिगमध्ये ही हत्या झाली. अज्ञात आरोपीने तरुणीच्या अंगावर धारधार शस्त्राने सपासप वार करून तिला जागीच ठार केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तरुणीचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळून आला असून हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे.

Police and forensic teams investigate the crime scene after a young woman was brutally murdered in a lodge in Lonere, Raigad.
अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका; नाशिकमध्ये गहू पिकाचे मोठे नुकसान|VIDEO

घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले आहे. पोलिसांकडून सध्या मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच, लॉजिंगमधील सीसीटीव्ही फुटेज आणि नोंदवही (Register) तपासली जात असून आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

Police and forensic teams investigate the crime scene after a young woman was brutally murdered in a lodge in Lonere, Raigad.
Aditya Thackeray Nanded Tour : आदित्य ठाकरे नांदेडच्या दिशेने रवाना! रुग्णालयात आज पाहणी दौरा

ही हत्या प्रेम प्रकरणातून झाली की अन्य कोणत्या कारणातून, याचा तपास आता गोरेगाव पोलीस करत आहेत. भरवस्तीत असलेल्या लॉजिंगमध्ये अशा प्रकारे हत्या झाल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com