गोरेगाव ड्रग रॅकेटचा पर्दाफाश! सत्तूच्या ड्रग साम्राज्यावर पालिकेचा बुलडोझर|VIDEO

Mumbai Drug Mafia Illegal Property Demolition Case: मुंबईतील गोरेगाव ड्रग्ज प्रकरणाचा विक्रोळीपर्यंत विस्तार झाला असून कुख्यात तस्कर सत्तूच्या बेकायदा मालमत्तांवर पालिकेने मोठी तोडक कारवाई केली आहे.

मुंबई: येथील गोरेगाव ड्रग्ज प्रकरणाचे धागेदोरे विक्रोळीपर्यंत पोहोचले असून कुख्यात ड्रग्ज तस्कर 'सत्तू' याच्या साम्राज्यावर प्रशासन तुटून पडलंय. सत्तूचं घर, जिम आणि कार्यालयातील अवैध बांधकामावर मुंबई महानगरपालिका आणि पोलिसांनी संयुक्तपणे हातोडा चालवलाय. ड्रग्ज माफियांचं कंबरडं मोडण्यासाठी ही मोठी तोडक कारवाई मानली जात आहे. तसेच या नेस्को संकुल ड्रग्स पार्टी प्रकरणात आता धक्कादायक खुलासा झाला असून शुद्धीवर आलेल्या तरुणीचा जबाब पोलिसांनी नोंदवलाय. आरोपी रौनकनं दिलेल्या पिवळ्या गोळीनंतर आपण थेट रुग्णालयातच शुद्धीवर आल्याचं तिनं सांगितलंय. धक्कादायक बाब म्हणजे, बंगले किंवा फार्महाऊसवरील पोलिसांच्या धास्तीमुळे आता मुंबईतील मोठ्या म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्स घेण्याचा नवा ट्रेंड समोर आलाय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com