Three people died in a car accident on Karjat Neral Marg
Three people died in a car accident on Karjat Neral MargSaam TV

Karjat News: कर्जत-नेरळ मार्गावर भयानक अपघात, भरधाव कार पुलावरून रेल्वे ट्रॅकवर कोसळली; तिघांचा जागीच मृत्यू

Karjat-Neral Car Accident: कर्जतहून नेरळच्या दिशेने निघालेली कार किरवली पुलावरून थेट रेल्वेट्रॅकवर कोसळली त्याचवेळी येणाऱ्या मालगाडीने कारला जोरदार धडक दिली.
Published on

सचिन कदम, साम टीव्ही

Karjat-Neral Car Accident News

कर्जत-नेरळ मार्गावरून भयानक घटना समोर आली आहे. कर्जतहून नेरळच्या दिशेने निघालेली कार किरवली पुलावरून थेट रेल्वे ट्रॅकवर कोसळली. त्याचवेळी समोरून येणाऱ्या मालगाडीने कारला जोरदार धडक दिली. या भयानक घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Three people died in a car accident on Karjat Neral Marg
Pune Koyta Gang: पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशत; मध्यरात्री १५ ते २० वाहनांची तोडफोड, नागरिक धास्तावले

जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना आज म्हणजेच मंगळवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास घडली. अपघातातील (Accident News) मृतांची नावे अद्याप समोर आलेली नाही.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त कार (Car Accident) कर्जतहून नेरळच्या दिशेने जात होती. या कारमधून पाच ते सहा जण प्रवास करीत होते. दरम्यान, कार किरवली पुलाजवळ आली असता, चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले.

क्षणार्धात कार पुलावरून रेल्वे ट्रॅकवर कोसळली. त्याचवेळी पनवेल कर्जत रेल्वे मार्गावरून मालगाडी जात होती. या मालगाडीने कारला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता, की यामध्ये कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला.

याशिवाय दोघेजण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली. बचावकार्य करत कारमधील जखमींना तातडीने उपचारासाठी MGM रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Three people died in a car accident on Karjat Neral Marg
Pune Crime News : काही महिन्यांपूर्वीच विवाह झालेल्या दाम्पत्याचे घरात आढळले मृतदेह, पुण्यातील घटनेने खळबळ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com