Pune Crime News : काही महिन्यांपूर्वीच विवाह झालेल्या दाम्पत्याचे घरात आढळले मृतदेह, पुण्यातील घटनेने खळबळ

Crime News : पाच महिन्यांपासून ते या ठिकाणी भाड्याने राहण्यासाठी आले होते. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहे.
Pune Crime News
Pune Crime NewsSaam TV
Published On

अक्षय बडवे

Pune News :

पुण्यातीव लोहगाव परिसरात राहत्या घरात पती-पत्नीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली तर पत्नीचा मृतदेह बेडवर आढळून आला आहे.

या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. मात्र ही आत्महत्या आहे की हत्या आहे याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र शवविच्छेदन अहवालानंतरच याबाबत खुलासा होईल. (Pune News)

Pune Crime News
Mumbai Fire Updates: दादरमधील कोहिनूर इमारतीच्या पार्किंगला मध्यरात्री भीषण आग; १६ ते १७ वाहने जळून खाक

पोलिसांना दिलेल्या माहिती नुसारत, किरण बोबडे आणि आरती बोबडे अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. बोबडे दाम्पत्या लोहगाव परिसरात भाड्याच्या घरात राहत होते. घरमालक तळमजल्यावर आणि बोबडे दाम्पत्य वर राहत होते. सोमवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घरातून दुर्घंधी येत असल्याचे घरमालकाच्या लक्षात आले.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यानंतर त्यांनी याबाबत पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत खोलीचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी त्यांना किरणचा मृतदेह छताच्या हुकला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. तर पत्नी आरती ही बेडवर मृत अवस्थेत आढळली.

Pune Crime News
Mumbai News: दिवाळीच्या तोंडावर अन्न आणि औषध प्रशासनाची मोठी कारवाई; मुंबईत भेसळयुक्त खाद्यतेलाचा साठा जप्त

मिळालेल्या माहितीनुसार, किरण हा पोस्टात कंत्राटी नोकरी करत होता. तो मुळचा माजलगाव बीड येथील आहे. तर पत्नी आरती ही येरवड्यातील असून एका खासगी बँकेत नोकरी करत होती. काही दिवसांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. पाच महिन्यांपासून ते या ठिकाणी भाड्याने राहण्यासाठी आले होते. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com