Mumbai News: दिवाळीच्या तोंडावर अन्न आणि औषध प्रशासनाची मोठी कारवाई; मुंबईत भेसळयुक्त खाद्यतेलाचा साठा जप्त

Mumbai Crime News: मुंबईत खाद्यतेलातील भेसळीच्या संशयावरून एफडीने सोमवारी छापे टाकून लाखो रुपयांचा खाद्यतेलाचा साठा जप्त केला आहे.
fda take action and seized adulterated oil stocks in mumbai sakinaka area
fda take action and seized adulterated oil stocks in mumbai sakinaka area Saam TV
Published On

संजय गडदे, साम टीव्ही

Mumbai Crime News

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मिठाई आणि अन्नपदार्थातील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने खंबीर पावले उचलली आहेत. मुंबईत खाद्यतेलातील भेसळीच्या संशयावरून एफडीने सोमवारी छापे टाकून लाखो रुपयांचा खाद्यतेलाचा साठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले असून खाद्यतेलाच्या नमुन्यांची तपासणी केल्यानंतरच तेलात भेसळ आहे की नाही, हे स्पष्ट होईल.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

fda take action and seized adulterated oil stocks in mumbai sakinaka area
Astrology Today: मनासारख्या घटना घडतील, डोक्यावरचा भार हलका होईल, या राशींना मिळणार गोड बातमी

दिवाळी सणासाठी खाद्यतेल, वनस्पती तूप याची मोठी मागणी असते. याचाच फायदा अनेकजण घेऊन भेसळयुक्त खाद्यतेल तसेच पदार्थांची विक्री केली जाते. हीच बाब लक्षात घेता अन्न व औषध प्रशासन विभाग झोन सातच्या वतीने मुंबईच्या अंधेरी पूर्वेकडील साकीनाका परिसरात अचानक छापेमारी करण्यात आली.

प्रगती ऑइल मिल आणि मंगल दीप फुड्स या दोन ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली. तब्बल १ लाख १५ हजार रुपये किमतीचे खाद्य तेलाचा साठा जप्त केला आहे. अस्वच्छ ठिकाणी केलेली साठवणूक, एकदा वापरलेल्या डब्यांचा पुर्नरवापर आणि हलक्या दर्जाचे तेल असल्याचा संशयातून ही कारवाई करण्यात आली असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

एमएचबी कॉलनीत ५०५ ग्राम चरससह दोघांना अटक

मुंबई पोलिसांच्या एमएचबी कॉलनी पोलिसांनी एनडीपीएस अंतर्गत केलेल्या कारवाईत दोन आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पोलिसांनी ५०५ ग्राम वजनाचे चरस हस्तगत केले असून त्याची बाजारातील किंमत सुमारे आठ लाख रुपये इतकी असल्याचे बोलले जात आहे.

अजगर अमीन हुसेन (४२ वर्षे) बिहार तर दीपक अक्षयबरनाथ सिंग (29 वर्षे) असे अटक आरोपींची नाव आहेत. अटक करण्यात आलेला आरोपी हा उत्तर प्रदेश येथील रहिवासी असून तो मुंबईच्या जोगेश्वरी पश्चिमेकडील बेहराम बाग परिसरात राहत आहे.

fda take action and seized adulterated oil stocks in mumbai sakinaka area
Chhattisgarh Election 2023: छत्तीसगड-मिझोरम विधानसभेसाठी आज मतदान; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, मतदारांचा कौल कुणाला?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com