संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या छत्तीसगढ आणि मिझोराम या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकींसाठी आज मतदान होणार आहे. छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यात २० जागांसाठी मतदान होईल. यासाठी एकूण २२३ उमेदवार निवडणूकीच्या मैदानात आहेत. या सर्वच जागा नक्षलग्रस्त बस्तर विभागातील आहेत. दुसरीकडे मिझोरमच्या सर्व ४० जागांसाठी आज मतदान पार पडणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
यासाठी ठिकठिकाणी मतदान केंद्रे उभारण्यात आली असून पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गेल्या निवडणुकीत म्हणजेच २०१८ मध्ये काँग्रेसने छत्तीसगडमध्ये भाजपचा दारुण पराभव केला होता. पहिल्या टप्प्यात काँग्रेसला सर्वाधिक १७ जागा मिळाल्या होत्या. तर भाजपला केवळ २ जागांवर विजय मिळवला आला होता. याशिवाय जनता काँग्रेसने १ जागा जिंकली होती.
दुसऱ्या टप्प्यातही काँग्रेसने छत्तीसगडमध्ये पूर्ण ताकद लावत सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे काँग्रेसला निवडणुकीत ९० पैकी ७१ जागांवर विजय मिळवता आला होता. दुसरीकडे भाजपला केवळ १३ जागा जिंकता आल्या होत्या. दरम्यान या निवडणुकीत भाजप पूर्णत: ताकदीने उतरला आहे.
पहिल्या टप्प्यातील जागांच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कथित महादेव बेटिंग अॅप घोटाळ्यावरून मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावर हल्लाबोल केला. तर अन्य भाजप नेत्यांनी धर्मांतरण, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था आणि भ्रष्टाचारावर राज्य सरकारला धारेवर धरले. भाजप नेत्यांनी मोठ्या रॅली काढल्या आणि पक्षाची निवडणूक आश्वासने मोदींची हमी असल्याचा दावा केला.
मिझोरममधील सर्व ४० जागांसाठी आज एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. मुख्यमंत्री झोरामथांगा यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी नॅशनल फ्रंट (एमएनएफ), झोराम पीपल्स मूव्हमेंट (झेडपीएम) आणि काँग्रेस यांच्यात येथे तिरंगी लढत होत आहे. मिझोराममध्ये २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत मोठी नाराजी पाहायला मिळाली होती.
१० वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसचा पराभव झाला होता. त्यामुळे मिझो नॅशनल फ्रंट पक्षाचे सरकार स्थापन झाले होते. त्यामुळे काँग्रेससमोर पुन्हा सत्ता मिळवण्याचे आव्हान असणार आहे. मिझोरामध्ये भाजप २३ जागांवर निवडणूक लढवत आहे. याआधी भाजपने २०१८ साली ३९ जागांवर निवडणूक लढवली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.