बंद असलेले सर्व कबुतरखाने तातडीने सुरू करा; अन्यथा... जैन मुनींचा विधानसभा अध्यक्षांना इशारा

Mumbai Closed Pigeon Houses Reopening Demand By Jain Community: मुंबईतील बंद असलेले सर्व कबुतरखाने तातडीने सुरू करण्याची मागणी जैन मुनी निलेशचंद्र महाराज यांनी केली आहे. राहुल नार्वेकरांची भेट घेत त्यांनी मागणी मान्य न झाल्यास आंदोलन आणि आमरण उपोषणाचा इशारा दिला.
MUMBAI PIGEON HOUSES ROW
MUMBAI PIGEON HOUSES ROWsaam tv
Published On

वैदेही काणेकर, साम टीव्ही

मुंबईतील बंद असलेले सर्व कबुतरखाने तातडीने सुरू करण्याची मागणी जैन मुनी निलेशचंद्र महाराज यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. कबुतरखाने सुरू करण्याबाबत आठ महिन्यांपूर्वी आश्वासन देण्यात आले होते. मात्र अद्याप त्यावर निर्णय झालेला नसल्याचा आरोप त्यांनी केला. आझाद मैदानात आठ महिन्यांपूर्वी जैन समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी कबुतरांना न्याय देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, अशी आठवण निलेशचंद्र महाराज यांनी राहुल नार्वेकर यांना करून दिली. मात्र आठ महिने उलटूनही मुंबईतील अनेक कबुतरखाने बंद असल्याचे त्यांनी सांगितले.

MUMBAI PIGEON HOUSES ROW
मागण्या मान्य करा, नाहीतर सामूहिक आत्मदहन!; शेतकऱ्यांचा सरकारला थेट इशारा

पायधुनी येथील श्री गोडीजी पार्श्वनाथ जैन मंदिरासह मुंबईतील कबुतरखान्यांमध्ये दाणा-पाणी देणे बंद असल्याचेही निलेशचंद्र महाराज यांनी भेटीदरम्यान स्पष्ट केले. त्यामुळे कबुतरांच्या देखभालीचा प्रश्न निर्माण झाला असून, याबाबत सरकारने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली. राहुल नार्वेकर यांची भेट घेतल्यानंतर निलेशचंद्र महाराज यांनी कबुतरखाने तातडीने सुरू करण्याची मागणी पुन्हा एकदा केली. मागणी मान्य न झाल्यास मोठे आंदोलन करण्यात येईल, तसेच आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

MUMBAI PIGEON HOUSES ROW
एक व्यक्ती, दोन देशांचे पासपोर्ट! भारत-पाकिस्तानचे पासपोर्ट बाळगणाऱ्याला अंबरनाथमधून अटक; मुंबई ATS च्या तपासाने खळबळ

न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरूच राहील, असा इशारा जैन मुनी निलेशचंद्र महाराज यांनी दिला आहे. दरम्यान दादर येथील कबुतर खाना बंद झाल्यानंतर जैन समाज हा आक्रमक झाला होता. यावेळी त्याठिकाणी जैन समाज हा रस्त्यावर उतरला होता. अशातच आज पुन्हा जैन समाजाने हा मुद्दा उचलल्याने येत्या काळात आणखी संघर्ष वाढण्याची चिन्हे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com