एक व्यक्ती, दोन देशांचे पासपोर्ट! भारत-पाकिस्तानचे पासपोर्ट बाळगणाऱ्याला अंबरनाथमधून अटक; मुंबई ATS च्या तपासाने खळबळ

Ambernath dual passport case : अंबरनाथमध्ये भारतीय आणि पाकिस्तानी पासपोर्ट बाळगल्याच्या आरोपावरून चांद अली अब्दुल रशीद सैयद याला अटक करण्यात आली आहे. हिललाईन पोलिसांसह मुंबई एटीएसकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
Ambernath dual passport case
Ambernath dual passport case
Published On

संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी

Ambernath Dual Passport Case : भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे पासपोर्ट बाळगल्याचा धक्कादायक प्रकार ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ परिसरात उघडकीस आला आहे. चांद अली अब्दुल रशीद सैयद (वय ३८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याला मलंगगड परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या या प्रकरणाचा तपास हिललाईन पोलीस करत असून प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुंबई एटीएसनेही (ATS) स्वतंत्र चौकशी सुरू केली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चांद अली याने २००९ मध्ये भारताचा पासपोर्ट मिळवला होता. त्यानंतर तो पाकिस्तानात गेला. तेथे वास्तव्यास असताना त्याने आपले भारतीय नागरिकत्व लपवले आणि ‘चांद अली रशीद अली’ या नावाने बनावट कागदपत्रांच्या आधारे पाकिस्तानी पासपोर्ट मिळवला.

यानंतर, याच पाकिस्तानी पासपोर्टच्या आधारे त्याने भारतात प्रवेश केला आणि तो अंबरनाथ परिसरात राहू लागला. विशेष म्हणजे, भारतात परतल्यानंतर २०२४ मध्ये त्याने आपली जुनी माहिती लपवून पॅन कार्ड, डोमिसाइल आणि इतर कागदपत्रांच्या आधारे पुन्हा नवीन भारतीय पासपोर्ट मिळवल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

Ambernath dual passport case
Nila Vikhe Patil : महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! नीला विखे पाटील स्वीडनच्या संसदेत खासदार

असा झाला पर्दाफाश:

प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाच्या पडताळणीदरम्यान या संपूर्ण प्रकरणाचा धागा पोलिसांच्या हाती लागला. संबंधित व्यक्तीच्या नागरिकत्वाबाबत आणि कागदपत्रांबाबत संशय निर्माण झाल्यानंतर सखोल चौकशी करण्यात आली. त्यातून त्याच्याकडे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे अधिकृत/बनावट पासपोर्ट असल्याचे स्पष्ट झाले.

Ambernath dual passport case
पंतप्रधान होणार की मुख्यमंत्रीच राहाणार? योगी आदित्यनाथ यांनी पहिल्यांदाच दिली थेट कबुली; राजकीय वर्तुळात खळबळ

सुरक्षा यंत्रणा सतर्क:

या प्रकरणी हिललाईन पोलिसांनी संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करून चांद अली याला अटक केली आहे. त्याचा पाकिस्तानातील वास्तवाचा कालावधी, तेथे मिळवलेली कागदपत्रे, भारतात परतल्यानंतरच्या हालचाली आणि दोन्ही पासपोर्टचा वापर कशासाठी करण्यात आला, याचा शोध घेतला जात आहे.

दरम्यान, या प्रकरणातील संवेदनशीलता पाहता मुंबई एटीएसनेही या तपासात उडी घेतली आहे. आरोपीचे पाकिस्तानातील संपर्क आणि भारतात तो कोणाकोणाच्या संपर्कात होता, या राष्ट्रीय सुरक्षेशी जोडलेल्या बाबींचा तपास आता यंत्रणा करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com