हुंड्यासाठी छळ, गर्भपाताची सक्ती असह्य झाली; २५ वर्षीय विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून आयुष्य संपवलं

pune news : २५ वर्षीय विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने चंदननगर परिसरात खळबळ उडाली आहे.
pune chandannagar news
pune shocking Saam tv
Published On

पुण्यात २५ वर्षीय विवाहितेने संपवले जीवन

विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासू-सासऱ्यावर गुन्हा दाखल

पुण्याच्या चंदन नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

पुण्यातील चंदननगर परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. कार, फ्लॅट खरेदीसाठी पैसे आणि सोन्याच्या अंगठीची मागणी करत सासरच्या मंडळींनी केलेल्या सततच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून विवाहितेने आयुष्य संपवल्याची घटना घडली आहे. तेजस्विनी गोरख सोनवणे असे २५ वर्षीय विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पुण्यातील चंदननगर पोलीस ठाण्यात पतीसह सासू आणि सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजस्विनी हिचं लग्न २५ जून २०२० रोजी गोरख सोनवणे याच्याशी झालं होतं. लग्नानंतर सुरुवातीला विवाहितेला सासरच्यांनी चांगली वागणूक दिली. जोडप्याला लहान मुलगी झाली. मुलगी झाल्यानंतर सासरच्या लोकांनी तेजस्विनीचा छळ करण्यास सुरुवात केली. पतीने कार घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणण्यासाठी तगादा लावला. विवाहितने पैसे आणण्यास नकार दिल्याने पतीने बेदम मारहाण आणि मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. नवऱ्याने जुलै २०२२ रोजी पतीने तेजस्विनीला माहेरी आणून सोडले. पैसे असतील तरच पाठवा, नाहीतर पाठवू नका" अशी तंबी पतीने सासरच्या मंडळींना दिली. काही दिवसांनी दोघांमधील वाद नातेवाईकांनी सोडवला.

तेजस्विनीला २८ नोव्हेंबर २०२३ रोजी मुलगी झाली. त्यावेळी सासरच्या लोकांनी डिलिव्हरीचा खर्च करण्यास नकार दिला. त्यामुळे तेजस्विनीच्या वडिलांनी १ लाखांची रोकड आणून हॉस्पिटलचे बिल भरलं. जून २०२४ मध्ये तेजस्विनी पुन्हा गरोदर राहिली. त्यावेळी पतीने तिला माहेरी सोडलं. तिला आधी मुलगी झाली, आता मुलगा की मुलगी हे चेक करा. मुलगा असेल तरच आमच्याकडे आणून सोडा, अमानवी पवित्रा गोरखने घेतला. या मानसिक तणावामुळे तेजस्विनीचा स्वत:हून गर्भपात झाला.

pune chandannagar news
Mumbai Rain : वरुणराजाचं थाटात आगमन! मुंबई-उपनगरात काळे ढग दाटले, मुसळधार पाऊस सुरू

गोरखला एप्रिल २०२६ मध्ये फ्लॅट खरेदी करायचा होता. त्यावेळी त्याने तेजस्विनीकडे ३ लाखांची मागणी केली. नकार दिल्यानंतर माहेरच्या लोकांसी संपर्क तोडण्यास सांगितले. अधिक मासात तेजस्विनीच्या वडिलांनी जावई आणि व्याहीना जेवण्यास बोलावलं. त्यावेळी सोन्याची अंगठी दिली तर जेवायला येऊ, नाहीतर येणार नसल्याचा हट्ट गोरखने धरला. त्यावेळी जेवायला आलेल्या गोरखने तेजस्विनीला मारहाण करत शिवीगाळ केली होती.

गोरखने २ जून २०२६ रोजी रात्री दहा वाजता गोरखने तेजस्विनीच्या वडिलांना फोन केला. त्यावेळी सांगितलं की, ' तेजस्विनीला दरवाजा लावून घेतलाय, ती दार उघडत नाही'. गोरखच्या फोननंतर तेजस्विनीचे मामाने फोन करून सांगितलं की, तेजस्विनीला आत्महत्या केली आहे. तिला पुण्यातील मनिपाल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. डॉक्टरांनी तिला रुग्णालयात दाखल करण्याआधी मृत घोषित केलं.

pune chandannagar news
निवडणुकीआधी पेटलं 'हलाल' राजकारण? गोकुळचा हलाल सर्टिफिकेटचा वाद कशाला?

मुलाला कार, फ्लॅट आणि सोन्याच्या अंगठीसाठी सासरच्यांनी शारीरिक व मानसिक छळ करणे, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तेजस्विनीच्या वडिलांनी पोलिसांत गु्न्हा दाखल केला. त्यानंतर या तक्रारीच्या आधारावर चंदननगर पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com