Vaishnavi Hagawane : मोठी बातमी ! शशांक हगवणेचा पाय आणखी खोलात, अजून एक कांड समोर

Shashank Hagwane : वैष्णवी हगवणे प्रकरणात न्यायालयानं वैष्णवीचे सासरे आणि दीर यांना ३१ मे पर्यंतची पोलीस कोठडी सुनावली होती. तर वैष्णवीचा नवरा शशांक, सासू लता आणि नणंद करिष्मा यांना एका दिवसाची पोलीस कोठवडी सुनावली होती.
 complaint of cheating against shashank hagwane
complaint of cheating against shashank hagwaneSaam Tv News
Published On

पुणे : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पुणे पोलिसांकडून हगवणे कुटुंबियांना नोटीस पाठवण्यात आली आहे. शस्त्र परवाना रद्द का करु नये? असं या नोटीसमधून विचारण्यात आलं आहे. हगवणे यांचा शस्त्र परवाना रद्द करावा अशी सूचना पिंपरी चिंचवड पोलिसांनी पत्रातून केली आहे. हगवणेंच्या शस्त्र परवान्याबाबत पिंपरी चिंचवड पोलिसांनी पुणे पोलिसांना अहवाल दिला आहे.

वैष्णवी हगवणे प्रकरणात न्यायालयानं वैष्णवीचे सासरे आणि दीर यांना ३१ मे पर्यंतची पोलीस कोठडी सुनावली होती. तर वैष्णवीचा नवरा शशांक, सासू लता आणि नणंद करिष्मा यांना एका दिवसाची पोलीस कोठवडी सुनावली होती. आज कोठडीचा कालावधी संपल्यानंतर पुन्हा तिघांना न्यायालयासमोर सादर करण्यात आलं.

 complaint of cheating against shashank hagwane
Devendra Fadnavis : दोघांपैकी एकही नेता संवाद साधण्यात उत्तम नाही; अजितदादा-शिंदेंबाबत फडणवीसांच्या 'त्या' विधानाची जोरदार चर्चा

त्याचदरम्यान, वैष्णवी हगवणेचा पती शशांक हगवणेचं आणखी एक प्रकरण आता समोर आलं आहे. त्यामुळे शशांकच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. शशांक हगवणे याने जेसीबी व्यवहार प्रकरणी ११ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रशांत येळवंडे यांनी फसवणुकीचा आरोप केला आहे. या प्रकरणात आता महाळुंगे चाकण इथं गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

नेमकं प्रकरण काय?

२५ लाख रुपयांमध्ये जेसीबीचा सौदा ठरला होता. त्यानुसार प्रशांत एळवंडे यांनी सुरुवातीला ५ लाख रुपये शशांकला दिले. बँकेचे हफ्ते भरण्यासाठी दरमहा ५० हजार रुपये शशांकला ते देत होते. मात्र शशांकने हफ्ता भरला नसल्यानं बँकेनं जेसीबी जप्त केला. शशांकने हा जेसीबी सोडवून आणला, मात्र प्रशांत यांनी दिलेले पैसे परत केले नाहीत. ही रक्कम ११ लाख ७० हजार रुपये आहे, तसेच आपल्याला बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्याचा आरोपही प्रशांत एळवंडे यांनी केला आहे.

 complaint of cheating against shashank hagwane
Corruption: राज्यातील कारागृहात भ्रष्टाचार; कैद्यांच्या गहू, चहा, तांदूळावर अधिकाऱ्यांचा डल्ला, गृहमंत्र्यांचं मात्र दुर्लक्ष

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com