Corruption: राज्यातील कारागृहात भ्रष्टाचार; कैद्यांच्या गहू, चहा, तांदूळावर अधिकाऱ्यांचा डल्ला, गृहमंत्र्यांचं मात्र दुर्लक्ष

Corruption In State Prisons: राज्यातील कारागृहात झालेल्या घोटाळ्यांची सर्व माहिती राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिलीय.
Corruption In State Prison Raju Shetty Allegations
Corruption In State PrisonSaam tv
Published On

सागर आव्हाड, साम प्रतिनिधी

राज्यातील कारागृहामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केलाय. मात्र गृहमंत्री याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केलाय. गृहमंत्र्यांना गेल्या ३ महिन्यात भ्रष्टाचार निदर्शनात आणून दिला. मात्र अद्याप त्याबाबत कोणतीच कारवाई करण्यात आली नाहीये. (Raju Shetty Allegations On Chief Minister)

राज्यातील कारागृहात झालेल्या घोटाळ्यांची माहिती राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री , मुख्य सचिव , गृह सचिव यांना दिली, तरीही त्यावर कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केलाय. राजू शेट्टी यांनी कारागृहात मागण्यात येणाऱ्या किराणा मालांची यादी जाहीर केलीय. त्यातून त्यांनी कसा भ्रष्टाचार होतोय याची माहिती दिलीय. येरवडा मध्यवर्ती काराग्रहात २ कोटी ५५ लाख ८९ हजार ४४० रूपयांच्या साहित्यांची खरेदी करण्यात आली.

पुणे मध्यवर्ती कारागृहाच्या अधिक्षक यांनी २०/०९/२०२४ रोजी पुरवठा करण्याबाबतचे आदेशान्वये २१/०९/२०२४ रोजी साहित्य पुरवठा करण्याचे पत्र दिले. त्यानंतर २३/०९/२०२४ रोजी हे पत्र कारागृह लिपीकांनी स्विकारलं. या पत्रामध्ये काराग्रहातील कैद्यांसाठी गहू, चहा, तांदूळ, तुरडाळ, चनाडाळ, गुळ, साखर, वनस्पती तेल, शेंगदाणे यासह मसाल्याचे पदार्थ व अन्य वस्तु पुरवठा करण्याचे २ कोटी ५५ लाख ८९ हजार ४४० ची ॲार्डर देण्यात आली होती.

मात्र पुरवठा करणारा ठेकेदारास काराग्रह अधिक्षक येरवडा काराग्रह यांनी सदरची खरेदी करत असताना पुरवठा करणा-या ठेकेदारास १९/०९/२०२४ रोजी साहित्य पुरवठा करण्याची ॲार्डर दिली. म्हणजेच पुरवठा करणारे ठेकेदार व अधिकारी यांनी संगनमताने पुरवठा आदेश पारित होण्याआधीच आणि निवीदा प्रसिद्ध होण्याआधीच २ कोटी ५५ लाख ८९ हजार ४४० रूपयाची खरेदी ॲार्डर देऊ साहित्य खरेदी केले.

सदरच्या खरेदी करण्यात आलेल्या साहित्याची त्यावेळेस बाजारात असणारी किंमत व प्रत्यक्षात खरेदी करण्यात आलेली किंमत यामध्ये मोठी तफावत दिसून येत असल्याचं राजू शेट्टी म्हणालेत. राज्यातील कारागृहातील लागलेली भ्रष्ट्राचाराची किड म्हणजे ख-या अर्थाने राजकारणी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मिळून संगनमताने टाकलेला दरोडा आहे.

गेल्या अनेक महिन्यापासून याबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही मुजोर आणि माजलेल्या प्रशासन आणि सरकारने याकडे ढुंकूनही बघितले नाही. यात राज्यातील अनेक बडे मंत्री आणि अधिकारी यांनी संगनमताने हा कारभार केला असल्याने यावर पांघरून घालण्याचे काम सर्वांकडूनच होत असल्याचा संशय येऊ लागल्याचं राजू शेट्टी म्हणालेत.

Corruption In State Prison Raju Shetty Allegations
Thane Crime : ठाण्यातील अंबरनाथमध्ये अज्ञात इसमाचा शीर नसलेला मृतदेह, शहरात खळबळ; पोलिसांनी व्यक्त केला वेगळाच संशय

कारागृहातील कैद्यांना देण्यात येणाऱ्या आहारातील साहित्याची कशा पद्धतीने खरेदी करून या अधिकाऱ्यांनी डल्ला मारलाय हे दाखविले. आज राज्य सरकारने राज्यातील कारागृह विभागात विद्युत पुरवठा खंडीत झाल्यावर कैद्यांच्या जीवितास धोका होऊ, नये म्हणून ३ जानेवारी २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार जनरेटर खरेदी करण्याबाबतचा निर्णय घेऊन ४ कोटी २३ लाख ६० हजार ६०० रूपयाच्या ३० केव्हीए च्या ३४ नग जनरेटर खरेदी करण्याचा निर्णय घेतला. या एका जनरेटरची किंमत जवळपास १२ लाख ४५ हजार ९०० रूपये प्रमाणेगृहीत धरून प्रशासकीय मान्यता देण्यात आली. तर मागणी केलेल्या जनरेटरची बाजारातील असणाऱ्या किमतीची चौकशी केली.

Corruption In State Prison Raju Shetty Allegations
Devendra Fadnavis : दोघांपैकी एकही नेता संवाद साधण्यात उत्तम नाही; अजितदादा-शिंदेंबाबत फडणवीसांच्या 'त्या' विधानाची जोरदार चर्चा

या जनरेटरच ३० केव्हीएचे महिंद्रा कंपनीचे जनरेटर बाजारात ५ लाख ४८ हजार ७०० रूपयास उपलब्ध होत असल्याचे निदर्शनास आले. २०२३ मध्ये ३४ नग जनरेटर खरेदी करत असताना १ नग खरेदीमध्ये जवळपास ६ लाख ९७ हजार २०० रूपयांचा फरक दिसू लागला. म्हणजेच राज्य सरकारने त्याकाळात काराग्रह विभागास ३४ नग जनरेटर करण्यास दिलेल्या निधीमध्ये २ कोटी ३७ लाख ४ हजार ८०० रूपयांचा भ्रष्ट्राचार झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येऊ लागले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com