

सिंहगड किल्ल्यावर ट्रेकिंगदरम्यान पर्यटकाचा मृत्यू
चक्कर येऊन खाली पडून जागीच मृत्यू झाला
वनविभागाने तत्काळ मदतकार्य केले
उष्णतेमुळे ट्रेकिंग करताना काळजी घेण्याचे आवाहन
पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ५५ वर्षीय पर्यटकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. ते मित्रांसोबत सिंहगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेले होते. अचानक चक्कर येऊन ते खाली कोसळले आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला. सुरेश रघुनाथ भोकरे (५५ वर्षे) असं मृत्यू झालेल्या पर्यटकाचे नाव होते. ते पुण्यातल्या कात्रजमधील गोकुळनगरमध्ये राहत होते. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश भोकरे हे मित्रांसोबत सिंहगडावर गेले होते. पहाटे ५ वाजता हे सर्व मित्रांसोबत गडाच्या पायथ्याशी असलेल्या आतकरवाडीत पोहोचले. सव्वा पाचच्या सुमारास त्यांनी पायवाटेने गड चढण्यास सुरुवात केली. गड चढत असताना पढेर मेटावरील मारुती मंदिराजवळ पोहोचल्यानंतर सर्वजण काही वेळ विश्रांतीसाठी थांबले. त्यानंतर ते सर्वजण पुन्हा चालू लागले. त्यावेळी अचानक भोकरे यांना चक्कर आली आणि ते खाली कोसळले.
या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी बळीराम वायकर, नितीन गोळे, उत्तम खामकर आणि संदीप कोळी यांनी घटनास्थळी धाव घेत मदतीचे कार्य केले. या सर्वांनी तातडकीने सुरेश यांना स्ट्रेचरवरून गडाच्या पायथ्याशी आणले. त्यांना एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. पण उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषीत केले.
सध्या उन्हाचा तडाखा वाढला आहे. तीव्र उन्हामुळे आणि शारीरिक श्रमामुळे वृद्ध तसेच आजारी व्यक्तींनी डोंगर चढणे टाळावे, असे आवाहन सिंहगड वन विभागाचे वन परिमंडळ अधिकारी समाधान पाटील यांनी केले आहे. कडक उन्हाळा आणि उकाडा वाढल्यामुळे अनेकाना प्रचंड त्रास होत आहे. राज्यात उष्माघातामुळे आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नगरिकांनी काळजी घेण्याचे आणि दुपारच्या वेळी घराबाहेर पडू नये असे आवाहन केले जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.