Pune : पुण्यातील लॉजवर बंद दाराआड सुरु होता भयंकर प्रकार! पोलिसांनी धाड टाकताच ९ महिला नको त्या अवस्थेत सापडल्या

Pune Sex Racket Busted News : पुण्यातील चिखली परिसरातील आदित्य लॉजवर पोलिसांनी छापा टाकत मोठे देहविक्री रॅकेट उध्वस्त केले. या कारवाईत ९ महिलांची सुटका करण्यात आली असून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pune : पुण्यातील लॉजवर बंद दाराआड सुरु होता भयंकर प्रकार! पोलिसांनी धाड टाकताच ९ महिला नको त्या अवस्थेत सापडल्या
Pune Prostitution Racket NewsSaam Tv
Published On
Summary
  • पुण्यातील आदित्य लॉजवर पोलिसांचा छापा

  • 9 महिलांची सुटका, मोठे रॅकेट उध्वस्त

  • बांगलादेशी महिलेचीही सुटका

  • आरोपींवर गुन्हा दाखल, तपास सुरू

गोपाळ मोटघरे, पिंपरी चिंचवड

Pune Chikhali Sex Racket Busted News गेल्या काही दिवसांमध्ये पुणे पोलिसांनी कडक कारवाई करत अवैधरित्या सुरु असलेल्या वेश्या व्यवसाय मोडकळीस आणला. तसेच बनावट ओळखपत्र दाखवून पुण्यात वास्तव्य करणाऱ्या कित्येक बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे. अशातच आता चिखली येथील आदित्य लॉजवर पोलिसांनी छापा टाकत एका मोठ्या देहविक्री व्यवसायाचा पर्दाफार्श करण्यात आला. या रॅकेटमधून तब्बल ९ महिलांची सुटका करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना देहू-आळंदी रस्त्यावरील आदित्य लॉजवर काहीतरी चुकीचे काम सुरु असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या सूचनेनुसार या लॉजवर छापा टाकण्यात आला. त्या लॉजचा वापर अवैध वेश्याव्यवसाय चालवण्यासाठी केला जात होता. पोलिसांनी धाड टाकली तेव्हा या लॉजवर ९ तरुणी सापडल्या.

Pune : पुण्यातील लॉजवर बंद दाराआड सुरु होता भयंकर प्रकार! पोलिसांनी धाड टाकताच ९ महिला नको त्या अवस्थेत सापडल्या
Shocking : भयंकर! ५०० हून अधिक तरुणींचे खासगी व्हिडिओ अन् फोटो; व्हायरल करण्याची धमकी देऊन कोट्यवधींना लुटलं

बांगलादेशातून तस्करी करून आणलेल्या एका तरुणीसह ९ महिलांची सुटका पोलिसांनी केली आहे. तसेच बांगलादेशी तरुणीला पोलिसांनी मायदेशी पाठवण्याची प्रक्रिया सुरु केली असून सध्या तिला पोलीस सुरक्षेखाली ठेवण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी लॉज मॅनेजर अशोक बाबुराव बाबर आणि कामगार अकिबुल खालेक मुल्ला या दोघांना अटक केली आहे. तसेच लॉज चालक सुदर्शन पवार, जागा मालक नाना बोराटे आणि साहिल ऊर्फ शाहीन मंडल यांच्याविरुद्ध चिखली पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता आणि पिटा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : पुण्यातील लॉजवर बंद दाराआड सुरु होता भयंकर प्रकार! पोलिसांनी धाड टाकताच ९ महिला नको त्या अवस्थेत सापडल्या
Political News : काँग्रेस नेत्याची घरात घुसून हत्या, गाढ झोपेत असतानाच धारदार शस्त्राने हल्ला करत जागीच संपवलं

पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी म्हटले की, त्यांना आदित्य लॉजवर वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे घटनास्थळी जाऊन प्लॅननुसार सापळा रचून ९ तरुणींना ताब्यात घेण्यात आलं असून वेश्याव्यवसायातील सर्वात मोठं रॅकेट उध्वस्त करण्यात आलं. संबंधित आरोपींवर लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल, तसेच अजून इतर ठिकाणी सुरु असलेले अवैध वेश्यावसाय उध्वस्त करू असे पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com