Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरातील मुख्य रस्ते २३ जानेवारीला बंद, पर्यायी मार्ग कोणते?

Pune Traffic Change: पुणे शहरातील मुख्य रस्ते येत्या २३ जानेवारी म्हणजे शुक्रवारी बंद राहणार आहेत. पुणे ग्रँड चॅलेंज टूर या सायकल स्पर्धेमुळे रस्ते बंद ठेवण्यात येणार आहेत. पुणे वाहतूक पोलिसांकडून पर्यायी मार्ग देखील सांगण्यात आले आहेत.
Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरातील मुख्य रस्ते २३ जानेवारीला बंद, पर्यायी मार्ग कोणते?
Pune Traffic Changes Saam Tv
Published On

Summary -

  • पुण्यात २३ जानेवारीला मोठे वाहतूक बदल करण्यात आले आहेत

  • दुपारी १२ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत शहरातील मुख्य रस्ते बंद राहणार

  • पुणे ग्रँड चॅलेंज टूर सायकल स्पर्धेमुळे रस्ते राहणार बंद

  • शहरातील अनेक शाळांना सुट्टी जाहीर

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. पुणे शहरातील वाहतुकीमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. २३ जानेवारी म्हणजे शुक्रवारी पुण्यातील मध्यवर्ती भागासह उपनगरातील अनेक रस्ते बंद राहणार आहेत. पुणे ग्रँड चॅलेंज टूर या सायकल स्पर्धेच्या अखेरच्या टप्प्यात निमित्त रस्ते बंद राहणार आहेत. शुक्रवारी दुपारी १२ वाजल्यापासून ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत हे रस्ते बंद राहणार आहेत.

विद्यापीठ रस्ता, एस बी रोड, बालगंधर्व रस्ता यासारखे पुणे शहरातील प्रमुख रस्ते बंद राहणार आहेत. वाहनचालकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करण्याचे वाहतूक पोलिसांनी आवाहन केले आहे. तर या स्पर्धेमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक सरकारी आणि खासगी शाळांना देखील २३ जानेवारीला सुट्टी देण्यात आली आहे.

पुणे ग्रँड चॅलेंज टूर-२०२६ आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेचा चौथा टप्पा हा बालेवाडी ते बालगंधर्व रंगमंदिर या दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. त्याचे एकूण ५८ किलो मीटर अंतर आहे. या स्पर्धेमुळे पुणे शहरातील होणारी वाहतूक कोंडी तसेच बहुतेक शाळेतील विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश जारी करण्यात आले आहे. पुणेकरांनी यावेळी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरातील मुख्य रस्ते २३ जानेवारीला बंद, पर्यायी मार्ग कोणते?
Pune: महिला रुग्णाचा मृतदेह अचानक गायब, रुबी हॉल क्लिनिकमधील धक्कादायक प्रकार; पुण्यात खळबळ

पुण्यातील हे रस्ते राहणार बंद तसंच पर्यायी मार्ग कुठले ते पहा -

बंद असलेला मार्ग: राधा चौक ते सुसखिंड रोड (बेंगलोर हायवे सर्विस रोड

पर्यायी मार्ग: बाणेररोड राधाचौक मार्गे म्हाळुंगे हिंजवडीला जाणा-यांनी सायकर चौकातुन युटर्न घेवुन बालेवाडी फाट्यापासुन हिंजवडी

बाणेर रोडने सुसगावला जाणाऱ्यांनी सायकर ममता चौक बैंगलोर मुंबई महामार्ग सुसब्रिज सर्व्हिस रोडने सुतारवाडी अंडरपास सर्व्हिस रोडने सुसगाव

बाणेर रोडने बावधन किंवा हायवेला जाण्यासाठी सायकर चौक ममता चौक - पुणे मुंबई महामार्ग

बंद असलेला मार्ग: पुनम बेकरी ते पाषाण सुस रोडने पाषाण सर्कल

पर्यायी मार्ग: सुतारवाडी रोड / पुणे मुंबई हायवे मार्गे

बंद असलेला मार्ग: पाषाण सर्कल ते एनसीएल ते अभिमान श्री सोसा, ते पुणे विद्यापीठ चौक

पर्यायी मार्ग: बाणेर रोड मागे

बंद असलेला मार्ग: पुणे विद्यापीठ ते ब्रेम्हण चौक ते राजीव गांधी ब्रिज

पर्यायी मार्ग: बेम्हण चौक स्पायसर कॉलेज डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक रेजहिल्स /चर्च चौक मार्गे

बंद असलेला मार्ग: राजीव गांधी ब्रिज ते एस.बी. जंक्शन

पर्यायी मार्ग: ब्रेम्हण चौक स्पायरार कॉलेज डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक रेजहिल्स /चर्च चौक मार्गे

बंद असलेला मार्ग: एस.बी.जक्र्शन ते जे. डब्ल्यू मेरिएट हॉटेल ते बालभारती ते पत्रकार भवन (एस.बी. रोड)

पर्यायी मार्ग: गणेश खिंड रोड नरगिस दत्त रोड मार्गे

बंद असलेला मार्ग: पत्रकार भवन ते लॉ कॉलेज रोड ते प्रभात रोड ते शेलार मामा चौक कर्वे रोड

पर्यायी मार्ग: भांडारकर रोड, बी.एम.सी.सी. रोड

Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरातील मुख्य रस्ते २३ जानेवारीला बंद, पर्यायी मार्ग कोणते?
Pune Accident : दीड वर्षापूर्वी लग्न, आता अपघातात मृत्यू, पुण्यात एसटी बसने उड्डाणपूलावर राजाला उडवले

बंद असलेला मार्ग: शेलार मामा चौक ते कर्वे पुतळा चौक

पर्यायी मार्ग: लॉ कॉलेज रोड एफ.टी.आय पर्यंतचा मार्ग नदी पात्रातील मार्ग

बंद असलेला मार्ग: कर्वे पुतळा ते डी पी रोड ते सुतार हॉस्पिटल ते पौड रोड

पर्यायी मार्ग: डी.पी. रोड, वारजे रोड, गुळवणी महाराज रोड

बंद असलेला मार्ग: नळ स्टॉप चौक ते म्हात्रे ब्रिज ते सेनादत्त पोलीस चौकी चौक

पर्यायी मार्ग: डी.पी. रोड पुढे सिंहगड रोड मार्गे महादेव मंदिर चौक, गुळवणी महाराज रोड

बंद असलेला मार्ग: ए बी सी चौक ते हुतात्मा चौक दुगडु शेठ हलवाई गणपती ते मंडई चौक ते खडक पोलीस स्टेशन ते राष्ट्रभूषण चौक

पर्यायी मार्ग: महाराणा प्रताप सिंह रोड जेधे प्रसाद रोड मार्गे

बंद असलेला मार्ग: ना सी फड़के चौक ते निलायम थिएटर ते सावरकर चौक सारसबाग

पर्यायी मार्ग: थोरले माधवराव पेशवे रोड मार्गे सिंहगड रोड मार्गे

Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरातील मुख्य रस्ते २३ जानेवारीला बंद, पर्यायी मार्ग कोणते?
Pune Satara Highway: पुणे सातारा प्रवास सुसाट होणार! ४५ मिनिटे वाचणार; सरकारचा मास्टरप्लान

बंद असलेला मार्ग: नरपतगिरी चौक ते बैनर्जी चौक ते नेहरु मेमोरियल चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक

पर्यायी मार्ग: लक्ष्मी रोड, क्वॉटर गेट चौक मार्गे महात्मा फुले रोड मार्गे खाणे मारूती चौक

बंद असलेला मार्ग: घोरपडी जंक्शन ते साधुवासवानी चौक ते बोल्हाई चौक

पर्यायी मार्ग: इस्कॉन मंदिर कैंप रोड व सर्किट हाऊस समोरील मार्ग

बंद असलेला मार्ग: लाल महल ते शनिवार वाडा ते स.गो. बर्वे चौक

पर्यायी मार्ग: कुंभार वाळा रोड डेंगळे पुल मार्गे कामगार पुतळा चीक मार्गाचा वापर करावा तसेच केळकर रोड व नदीपात्र रोड मार्गे पुढे

बंद असलेला मार्ग: गरवारे चौक ते बालगंधर्व चौक

पर्यायी मार्ग: नदीपात्र रोड व आपटे रोड झाशी राणी चौक, कॉग्रेस भवन रोड मनपा भवन, ब्रिज खालुन डेंगळे पुल मार्गे तसेच लकडी पुल, केळकर रोड

बंद असलेला मार्ग: बालगंधर्व चौक परिसर

पर्यायी मार्ग: नदीपात्र रोड व आपटे रोड झाशी राणी चौक, कॉग्रेस भवन रोड मनपा भवन, ब्रिज खालुन डेंगळे पुल मार्गे तसेच लकड़ी पुल, केळकर रोड, नदीपात्र रोड

Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरातील मुख्य रस्ते २३ जानेवारीला बंद, पर्यायी मार्ग कोणते?
Pune Tempo Accident: पुण्यात अपघाताचा थरार! अनियंत्रित टेम्पोची फुटपाथवरील अनेक वाहनांना धडक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com