

पुणे सातारा प्रवास सुसाट होणार
खंबाटकी घाटात दोन बोगद्यांचे काम अंतिम टप्प्यात
४५ मिनिटांचा वेळ वाचणार
पुणे ते सातारा प्रवास आता सुसाट होणार आहे. खंबाटकी घाटातील एस या आकाराच्या वळणाच्या घाट रस्त्याला पर्याय म्हणून नवीन बोगदे बांधण्यात आले आहे. हा एस आकाराचा घाटातील रस्ता खूपच धोकादायक आहे. त्यामुळे या मार्गावरुन वाहने खूप हळू न्यावी लागत होती. परंतु आता तीन पदरी दोन बोगदे सुरु होणार आहेत. या बोगद्यांचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे.
गेल्या ६ वर्षांपासून या दोन बोगद्याचं काम सुरु होतं. त्यातील पुण्याकडून साताऱ्याकडे येणारा एक बोगदा वाहतुकीसाठी सुरु केला आहे. शनिवारपासून हा बोगदा सुरु झाला आहे. बोगद्याच्या उताराला दरीपुलाचे काम बाकी आहे. त्यामुळे प्रायोगिक तत्वावर फक्त हलक्या वाहनांसाठी वाहतूक सुरु केली आहे. यामुळे तुमच्या प्रवासाचे अंतर २० ते २५मिनिटांनी वाचणार आहे.
पुणे सातारा मार्गावरचा धोकादायक रस्त्याला पर्यायी मार्ग
पुणे सातारा मार्गावर खंबाटकी घाटाता एस आकाराचा घाट रस्ता आहे. या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले होते. या रस्त्यावरुन एकदम हळू वाहतूक होते. वीकेंडला वाहतूक कोंडी होते. त्यामुळे दोन नवीन बोगद्यांच्या रस्त्याच्या निर्मितीला मान्यता दिली होती.
२०१९ मध्ये या कामांना सुरुवात झाली होता. मात्र, कोरोनामुळे काम वेगाने होत नव्हते. काम रखडले होते. दरम्यान, यासाठी ३ वर्षांची मुदत देण्यात आली होती. मात्र, या बोगद्याच्या कामाला २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आता हे काम अंतिम टप्प्यात आहे.
नवीन बोगदा कसा असणार आहे?
खंबाटकीतील नवीन रस्ता ६.४६ किलोमीटर लांब असणार आहे. डाव्या बाजूला १३०७ मीटरचा आणि उजव्या बाजूला १२२४ लांबीचा तीन पदरी दुहेरी बोगजा असणार आहे. तसेच दोन्ही बाजूला व्हायाडक्ट उभारण्यात आला आहे. पुण्याच्या बाजूचा बोगदा संपल्यावर दरी पूल उभारण्यात येत आहे. याचेही काम ८५ टक्के पूर्ण झाले आहे.
तीन पदरी बोगद्यांमुळे आता प्रवासाचा वेळ ४५ मिनिटांचा वाचणार आहे. फक्त १० ते १५ मिनिटात तुम्ही हे अंतर पार करु शकतात. साताऱ्याकडून पुण्याकडे जाणाऱ्या बोगद्याच्या वाहतूकीसाठी शनिवारी चाचणी घेण्यात आली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.