

विश्वभूषण लिमये, सोलापूर प्रतिनिधी
Panvel to Akkalkot accident : पुणे–सोलापूर महामार्गावर मोहोळजवळ देवडी पाटीमध्ये शनिवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. पनवेल येथून अक्कलकोट येथे देवदर्शनासाठी निघालेली एरटीका कार (MH-46 Z 4536) या वाहनाच्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने सदर वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोरात आदळून अपघात झाला. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झालाय. तर एक महिला जखमी आहे.
अपघातग्रस्त कारमध्ये एकूण सहा प्रवासी (तीन पुरुष व तीन महिला) होते. सर्व प्रवासी एकमेकांचे मित्र असल्याचे समजून येत आहे. अपघातात ५ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून ज्योती जयदास टाकले, रा. सेक्टर ७, पनवेल, जि. रायगड या महिला प्रवासी जखमी झाल्या आहेत. जखमी महिलेस तात्काळ उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, मोहोळ येथे दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
अपघातामधील मृतांची नावे -
1) माला रवी साळवे वय 40 वर्षे राहणार पंचशील नगर झोपडपट्टी सेक्टर नंबर 18 न्यू पनवेल
2) अर्चना तुकाराम भंडारे वय 47 वर्षे सेक्टर 7 खांदा कॉलनी पनवेल वेस्ट
3) विशाल नरेंद्र भोसले वय 41 वर्षे राहणार आरबीआय एम एस ओ रूम नंबर 8 रेल्वे कॉलनी पनवेल स्टेशन जवळ पनवेल
4) अमर पाटील ,खारघर
5) आनंद माळी.
अपघाताची माहिती मिळताच मोहोळ पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन पोलीस मदत पुरवून आवश्यक कार्यवाही करण्यात आली आहे. अपघात अत्यंत भीषण असून मृतदेह पूर्णतः वाहनामध्ये अडकलेल्या अवस्थेत आढळून आले. सदर वाहन रस्त्यापासून अंदाजे १० ते १५ फूट अंतरावर झुडपांमध्ये अडकल्याची माहिती मोहोळ पोलिसांकडून समजते. मृत व जखमी व्यक्तींची सविस्तर नावे,पत्ते, माहिती तसेच अपघाताचे नेमके कारण याबाबत पुढील माहिती घेणे सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.