Beed News : बीड पुन्हा हादरलं! GST अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू, धुळे-सोलापूर महामार्गावर कारमध्ये आढळला मृतदेह

Beed crime news today : बीडमध्ये जीएसटी विभागातील वरिष्ठ अधिकारी सचिन जाधवर यांचा मृतदेह त्यांच्या कारमध्ये आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
Beed crime news today
Beed crime news todaySaam TV Marathi
Published On

GST officer Sachin Jadhav death case in Beed : बीडमध्ये पुन्हा एकदा धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. जीएसटी विभागातील अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. सचिन जाधवर असे मृत अधिकऱ्याचे नाव आहे. ते मागील २४ तासांपासून बेपत्ता होते. सोलापूर धुळे महामार्गालगत कारमध्ये त्यांचा मृतदेह आढळला. धक्कादायक म्हणाजे कारमध्ये पोलिसांना कोयता आणि मडकं आढळल्याने खळबळ उडाली आहे. जाधवर यांच्या कारमध्ये एक पत्रही मिळाले आहे.

वरिष्ठ जीएसटी अधिकारी सचिन जाधवर यांचा मृतदेह त्यांच्याच कारमध्ये संशयास्पद अवस्थेत आढळल्याने बीडमध्ये एकच खळबळ उडाली. सचिन जाधवर यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. टोकाचा निर्णय घेण्याआधी सचिन जाधवर यांनी नोट लिहून ठेवली होती. त्यामध्ये त्यांनी वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून टोकाचा निर्णय घेतल्याचे नमूद केलेय. बीड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात अधिक तपास सुरू असल्याची माहिती बीड ग्रामीण पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Beed crime news today
Ladki Bahin Yojana : एकत्र ₹३००० का नाहीत? लाडक्या बहि‍णींचा संताप, थेट महामार्ग रोखला, पाहा व्हिडिओ

४५ वर्षाचे सचिन नारायण जाधवर हे वस्तू व सेवा कर विभागात (GST) महत्त्वाच्या वरिष्ठ पदावर कार्यरत होते. शुक्रवारी रात्री ते कामावरून घरी परतले नाहीत. त्यांचा फोनही बंद असल्याने कुटुंबियांनी शोधाशोध केली पण ते सापडले नाहीत. त्यामुळे जाधवर यांच्या कुटुंबियांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. शनिवारी दुपारी जाधवर यांचा मृतदेह धुळे-सोलापूर महामार्गालगत कपिलधार कमानीजवळील कारमध्ये आढळला. या प्रकरणाची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता. पंचनामा करून त्यांनी जाधवर यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. कारमधून पोलिसांनी सर्व गोष्टी जप्त केल्या अन् तपासाला सुरूवात केली.

Beed crime news today
ठाकरेंची मुंबईत सत्ता गेली अन् काहीवेळातच शिवसैनिकाला हार्ट अटॅक, बाळासाहेबांच्या पहिल्या महिला आमदाराचं निधन

वरिष्ठांवर सुसाईड नोटमध्ये गंभीर आरोप -

जाधवर यांच्या कारमध्ये पोलिसांना सुसाईड नोट सापडली. त्यामध्ये वरिष्ठाचे नाव होते. वरिष्ठ अधिकारी दिलीप फाटेंच्या त्रासाला कंटाळून आयुष्य संपनत असल्याचे जाधवर यांनी पत्रात लिहिले होते. ​या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने सूत्रे फिरवली. पोलिसांनी दिलीप फाटे यांना ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी करण्यात येत आहे.

Beed crime news today
BMC MNS Result : मुंबईत मनसेचे ६ नगरसेवक, ठाकरेंच्या घरी विजयी शिलेदारांचं औक्षण, पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com